तरुण भारत

आसाममधून 25 कोटी रुपयांचे हेरोईन जप्त, एकाला अटक

ऑनलाईन टीम / गुवाहाटी :


आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यातून 25 कोटी रुपयांचे 5 किलोग्रॅम पेक्षा अधिक हेरोईन जप्त करण्यात आले असून या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती डीजीपी भास्कर ज्योती महंता यांनी सोमवारी दिली.  

Advertisements


ते म्हणाले, ही कारवाई राज्यात अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या अभियानात करण्यात आली. पुढे ते म्हणाले, कार्बी आंगलोंग मधील पोलिसांनी काल रात्री आसाम नागालँड सीमेवरून 5 किलो ग्रॅमपेक्षा अधिक हेरोईन जप्त केले.  


पुढे ते म्हणाले, इस्माईल अली असे या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेले 5.05 किलो ग्रॅम हेरोइन हे जवळपास 25 कोटी रुपयांचे आहे. 

Related Stories

संरक्षण जगतात वाढणार भारताचा प्रभाव

Patil_p

कोंडी फोडण्यासाठी समिती नेमू!

Omkar B

ओमिक्रॉन’पासून दक्षतेसाठी गाईडलाईन्स

Patil_p

केरळ विमान दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू

Patil_p

दिल्लीत 3,827 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

भारतातील कोरोनाबाधितांनी पार केला 57 लाखांचा आकडा

Rohan_P
error: Content is protected !!