तरुण भारत

बांगलादेशचा श्रीलंका दौरा लांबणीवर

वृत्तसंस्था/ ढाका

कोरोना समस्येसाठी क्वारंटाईनच्या कालावधीमध्ये उभय देशांच्या क्रिकेट मंडळात  कोणताही करार अद्याप न झाल्याने बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisements

गेल्या मार्च महिन्यापासून जागतिक स्तरावर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या महामारीत लाखो लोकांचे बळी पडले असून कोटय़वधी लोकांना याची लागण झाली आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्येक देशाने आरोग्य सुरक्षेसाठी सक्तीची नियमावली अंमलात आणली आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला 14 दिवसांच्या कालावधीसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवावे लागते पण लंका आणि बांगलादेश क्रिकेट मंडळामध्ये क्वारंटाईन कालावधी संदर्भात एकमत झाले नाही. त्यामुळे बांगलादेशचा सप्टेंबर अखेरीस होणारा लंका दौरा पुन्हा लांबणीवर टाकण्यात आला आहे. सुरूवातीला बांगलादेशचा हा लंका दौरा जुलै-ऑगस्ट दरम्यान होणार होता. पण कोरोनामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. 27 सप्टेंबरपासून बांगलादेश संघ लंकेच्या दौऱयावर जाणार होता आणि उभय संघातील पहिली कसोटी 23 ऑक्टोबरपासून खेळविली जाणार होती. बांगलादेशचा संघ लंकेत दाखल झाल्यानंतर या संघातील सर्व खेळाडूंना 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहण्याची सक्ती श्रीलंकेच्या आरोग्य खात्यातर्फे करण्यात आली होती. पण बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपला नकार दर्शविला. गेल्या आठवडय़ात बांगलादेश संघातील वेगवान गोलंदाज अबु जायेद याला कोरोनाची लागण झाली होती.

Related Stories

मानस स्पोर्ट्स संघाकडे फॅन्को चषक

Omkar B

रविंदरला रौप्यपदक, फ्री स्टाईल प्रकारात भारताला 6 पदके

Amit Kulkarni

युफा पात्रता स्पर्धेतही व्हीएआरचा वापर

Patil_p

शनिवारचे तिन्ही अटीतटीचे कबड्डी सामने बरोबरीत

Patil_p

टोकियो ऑलिम्पिकची यशस्वी सांगता

Patil_p

मेजर ध्यानचंद चित्रपटाचे अभिषेक चौबे दिग्दर्शक

Patil_p
error: Content is protected !!