तरुण भारत

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे. 

Advertisements


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी गेले 10 दिवस कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे…तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होईन, असे ही त्यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, यापूर्वी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. 

Related Stories

सांगली : जिल्हाधिकारी,आयुक्त, सिव्हिल सर्जनची बदली करा – खासदार संजयकाका पाटील

Abhijeet Shinde

सांगली : वसगडेत अज्ञात कबरीमुळे खळबळ

Abhijeet Shinde

लाचखोर पाटकऱयास चार वर्षे सक्तमजुरी

Patil_p

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी ‘ते’ वृत्त चुकीचं ; पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

Abhijeet Shinde

आर्यन खान प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशनात होणार गदारोळ

datta jadhav

”मराठा समाजाला आरक्षण देण्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकार कमी पडलं”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!