तरुण भारत

टीकोप्लेनिन : कोरोनावर 10 पट अधिक प्रभावी औषध

टीकोप्लेनिन नावाच्या एका ग्लायकोपेप्टाइ अँटीबॉटिक औषधाने कोरोना विषाणूवरील उपचारात नवी आशा जागविली आहे. नव्या संशोधनात हे औषध सद्यस्थितीत वापर होणाऱया औषधांपेक्षा 10 पट अधिक प्रभावी ठरू शकते असे दिसून आले आहे.

इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीने 23 औषधांच्या संशोधनानंतर हा दावा केला आहे. आयआयटी-डीच्या कुसुम स्कुल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेसनने कोरोना विषाणूसाठी वापरल्या जाणाऱया 23 औषधांची पडताळणी केली आहे. उर्वरित औषधांशी टीकोप्लेनिनच्या प्रभावाची तुलना करण्यात आली असता हे औषध 10 पट अधिक प्रभावी दिसून आले आहे.

Advertisements

टीकोप्लेनिन सार्स-कोव-2 च्या विरोधात वापर होणाऱया उर्वरित मुख्य औषधे म्हणजेच हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि लोपिनॅविरच्या तुलनेत 10-20 पट अधिक प्रभावी आढळून आल्याची माहिती आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक अशोक पटेल यांनी दिली आहे.

व्यापक संशोधनाची गरज

टीकोप्लेनिन एक  ग्लायकोपेप्टाइड अँटीबायोटिक आहे. हे औषध माणसांमध्ये कमी टॉक्सिक प्रोफाइल युक्त ग्रॅम-पॉझिटिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन्सला बरे करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरले जाते. या औषधाला अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनकडून मान्यता मिळाली आहे. रोम येथील सेपिएंजा विद्यापीठात टीकोप्लेनिनसोबत एक क्लीनिकल स्टडी पार पडली आहे. कोविड-19 च्या विरोधात टीकोप्लेनिनची भूमिका काय आहे हे निश्चित करण्यासाठी विविध टप्प्यांच्या कोरोनाबाधितांवर अध्ययन करण्याची गरज असल्याचे विधान प्राध्यापक पटेल यांनी केले आहे.

Related Stories

दहशतवादी म्होरके पाकिस्तानी नागरिक

Patil_p

बलूच संघटनेचा हल्ला, 4 पाकिस्तानी सैनिक ठार

Patil_p

भारतासोबत फायजर कंपनीची चर्चा सुरू

Patil_p

कठुआ : पाकिस्तानचे हेरगिरी करणारे ड्रोन पाडले

datta jadhav

वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग, आढळले नवे 6 रुग्ण

datta jadhav

अमेरिकेत 37 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!