तरुण भारत

अमेरिकेच्या अध्यक्षांवर करचोरीचा आरोप

2017 मध्ये केवळ 55 हजार रुपयांचा करभरणा : डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला आरोप : प्रचारात मुद्दा रंगणार

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisements

द न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कथित करचोरीसंबंधी खुलासा केला आहे. या वृत्तानुसार ट्रम्प यांनी 2016 मध्ये त्यांनी (2016-17 आर्थिक वर्ष) 750 डॉलर्सचा (सुमारे 55,000 रुपये) कर भरला होता. परंतु याच काळात त्यांच्या कंपनीने भारतात 1,45,400 डॉलर्सचा (सुमारे 1.07 कोटी रुपये) कर भरला होता. ट्रम्प अध्यक्षपदाच्या दुसऱया कार्यकाळासाठी निवडणूक लढवत असताना त्यांच्या करभरण्याचा मुद्दा विशेषत्वाने उपस्थित केला जात आहे.

मागील 15 वर्षांपैकी 10 वर्षे ट्रम्प यांनी कुठलाच कर भरलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. कमाईपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्टीकरण याप्रकरणी ट्रम्प यांच्या वतीने देण्यात आले होते.

न्यूयॉर्क टाईम्सचे वृत्त ट्रम्प यांनी फेटाळून लावले आहे. हे बनावट वृत्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर अमेरिकेच्या अध्यक्षासाठी स्वतःचा वैयक्तिक तपशील उघड करणे अनिवार्य नाही. परंतु रिचर्ड निक्सन (1969-74) पासून बराक ओबामांपर्यंत (2008-16) अध्यक्षांनी वैयक्तिक वित्तीय लेखाजोखा मांडला आहे. ट्रम्प यांनी प्राप्तिकर विवरणपत्र प्रसिद्ध करण्यास नकार देत ही परंपरा मोडीत काढली आहे. 2016 च्या निवडणुकांमध्येही ट्रम्प यांच्या करभरण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. अध्यक्षीय कार्यकाळातही या मुद्दय़ाने त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रेटिक पार्टीकडून पुन्हा एकदा हा मुद्दा प्रचारात उपस्थित केला जाऊ शकतो.

वादविवादापूर्वी समोर आला अहवाल

एनवायटीचा हा वृत्तअहवाल अध्यक्षीय निवडणुकीसाठी होणाऱया पारंपरिक अध्यक्षीय वादविवादाच्या तोंडावर प्रसिद्ध झाला आहे. पहिला वादविवाद कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये होणार आहे. दुसरा वादविवाद कार्यक्रम 15 ऑक्टोबर आणि तिसरा 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Related Stories

अब्जाधीश ऍलन मस्क यांचा लस घेण्यास नकार

Patil_p

पंतप्रधान मोदींनी बांगलादेशातील काली मंदिराला दिली भेट

Abhijeet Shinde

इस्लामाबादमध्ये मुखपट्टा अनिवार्य

Patil_p

चीन : पाकिटांवर विषाणू

Patil_p

शरीरातील कोरोनाचा ‘मित्र अन् शत्रू’ उघड

Patil_p

इटलीत 104 वर्षाच्या आजींनी केली कोरोनावर मात

prashant_c
error: Content is protected !!