तरुण भारत

कॅथरीन रुबिंस करणार अंतराळातून मतदान

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. नासा मधील 41 वर्षीय महिला अंतराळवीर कॅथरीन रुबिंस ही ऑक्टोबरच्या मध्यालाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनसाठी अवकाशात उड्डाण घेणार आहे. त्यामुळे ती अंतराळ स्टेशनमधूनच तिचा मतदानाचा हक्क बजावणार आहे. अंतराळातून मतदान करणारी कॅथरीन ही कदाचित पहिली महिला अंतराळवीर ठरेल. 

Advertisements

कॅथरीन ही आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षित नेटवर्क यामुळे मतदान प्रक्रियेत सामील होऊ शकणार आहे. ती 323 किमी उंचीवरून मतदान करेल. तिचे मतदान गुप्त राहील याची नासा काळजी घेणार आहे. कॅथरीन सध्या रशियाच्या युरी गार्गीन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये आहे. यापूर्वी तिने 7 जुलै 2016 मध्ये प्रथम अंतराळात झेप घेऊन स्पेस स्टेशनवर 115 दिवस मुक्काम केला होता. आता ती दुसऱ्यांदा अंतराळ प्रवासाला जात आहे. कॅथरीन या प्रवासात सहा महिने स्पेस स्टेशनवर राहणार आहे.

ज्या अंतराळवीरांना उपस्थित राहून मतदान करणे शक्य नसते त्यांना मतदानाला अनुपस्थित राहूनही मतदानाचा हक्क बजावण्याची सोय करण्यात आली आहे.

Related Stories

भारताला घेरण्यासाठी चीन उभारतोय हवाई तळ

datta jadhav

एअर इंडियासाठी अडचण

Patil_p

इटलीत कठोर निर्बंध

Patil_p

इस्रायल : निदर्शने सुरूच

Omkar B

कोरोना चौकशी प्रकरणी चीनची माघार

Patil_p

घरमालक असावा तर असा!

Amit Kulkarni
error: Content is protected !!