तरुण भारत

एका माध्यमाच्या ‘सिक्रेट’ शाळेतून विद्यार्थी पालकांवर दबाव

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शाळेमधुन विद्यार्थ्यांच्या पालकांवर फी भरण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रकार रत्नागिरी शहरालगतच्या एका माध्यमाच्या ‘सिक्रेट’ शाळेत घडला आहे. फी न भरल्यास रिझल्ट देणार नाहा.r तसेच 1 ऑक्टोबरपासुन आनलाईन शिक्षण नाही म्हणून पालक त्रस्त झाल्याने रत्नागिरी जिल्हा काँग्रेसकडून पालकांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. त्याबाबत राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार मांडल्यानंतर त्यांनी संबंधित शाळा प्रशासनाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisements

   लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांच्या पालकांना जुन, जुलै, ऑगस्ट, स्प्टेंबर महिन्याची टर्म फी, ई-लर्निंग फी, मॅनेजमेंट ऍक्टिवीटी फी, भरण्याचा शाळा सुरु नसतानाही शाळा प्रशासनाकडून तगादा सुरु असल्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. टय़ुशन फी म्हणजे महिन्याची शिकवायची फी ठीक आहे. पण आज विद्यार्थ्यांना आनलाईन शिक्षण दिवसातून फक्त 3 तास मिळत आहे. आनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलच्या डाटाचा खर्च मोठय़ा प्रमाणात येत आहे. काही विद्यार्थ्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम होत असल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आह.s आणि त्यासाठी दरवर्षीप्रमाणे फी घेणे हे योग्य नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

    रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्त अशोक जाधव यांच्याकडे काही पालकांनी संपर्क साधला. शहरालगतच्या एका माध्यमाच्या त्या शाळा प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाची तक्रार केली. अशोक जाधव यांनी त्वरीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. शिक्षणमंत्री गायकवाड यांनी संबंधीत शाळेची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे. त्यांचे सचिव यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि रत्नागिरी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना संबंधीत शाळेची चौकशी करुन कारवाई करण्याचे सांगितले आहे. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते अशोक जाधव यांनी शाळा प्रशासनाकडून पालकांना जर अशा प्रकारे त्रास होत असेल तर त्वरीत खालील मोबाइल नं. 7350348294, 9423293494 वर संपर्क साधावा, असे सांगितले आहे.

Related Stories

‘काजळी’मध्ये सापडली माशांची नवी प्रजात

Patil_p

वेळास समुद्रकिनारी सापडले मृत कासव

Patil_p

नववर्ष स्वागतासाठी आमीरखान सिंधुदुर्गात

NIKHIL_N

रत्नागिरी : मटका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

triratna

बांबूला मिळाला एसटीचा आधार

NIKHIL_N

गणेशोत्सवानानंतर जिल्हय़ात पुन्हा लॉकडाऊन?

Patil_p
error: Content is protected !!