तरुण भारत

सुशांत आत्महत्या : एम्स हॉस्पिटलकडून सीबीआयकडे अहवाल सुपूर्त

ऑनलाईन टीम / मुंबई :


सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे. या व्हिसेरा रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा विषप्रयोग करण्यात आला नव्हता. तसेच त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विषकण आढळले नसल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

Advertisements


सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट एम्सकडून आज सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना क्लीन चीट दिली नसल्याचेही समोर आले आहे. कूपर रुग्णालयाच्या रिपोर्टला विस्तारीत रुपात पाहण्याची गरज आहे. त्यामुळे तुर्तास रुग्णालयाला क्लीन चिट मिळालेली नाही. कूपर रुग्णालयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होते. 


एम्सचा रिपोर्ट हा इशारा करत आहे की, कूपर रुग्णालयाकडून सुशांत प्रकरणात निष्काळजीपणा करण्यात आला. कूपर रुग्णालयातील डॉक्टर्सने सुशांतची ऑटोप्सी केली. ज्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सुशांतच्या गळ्यावरील निशाणाबाबत रिपोर्टमध्ये काहीच म्हटलेले नाही. एवढंच नव्हे तर त्याच्या मृत्यूची वेळ देखील नोंद करण्यात आलेली नाही.

Related Stories

तुझं माझं अरेंज मॅरेजमध्ये प्रीतम कागणे

Patil_p

‘दख्खनचा राजा’ मालिकेत स्थानिक कलाकारांना रोजगाराची संधी

triratna

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे थिएटर्स, मल्टिप्लेक्सवर ‘या’ तारखेपर्यंत राहणार निर्बंध

triratna

तुझं माझं जमतंयच्या सेटवर पार्टी हो रही है!

Patil_p

अभिनेत्री कंगना राणावतचा शिवसेनेच्यावतीने निषेध

Shankar_P

दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा : अमिता कुलकर्णी

datta jadhav
error: Content is protected !!