तरुण भारत

पेपरफ्रायचा आयपीओ पुढील वर्षी

मुंबई :

फर्निचरच्या रिटेल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया पेपरफ्रायला आपला आयपीओ (प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव) पुढच्या वषी सादर करायचा आहे, अशी माहिती कंपनीने नुकतीच दिली आहे.  सध्याच्या आर्थिक अस्थिरतेमुळे तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. तसा फटका फर्निचर क्षेत्रालाही अनुभवायला मिळाला आहे. फर्निचरच्या रिटेल उद्योगात असणारी पेपरफ्राय कंपनी पुढील वषी आपला आयपीओ सादर करणार आहे. आयपीओ सादर केल्यानंतर सहा ते नऊ महिने त्यावर लक्ष ठेवलं जाईल आणि दरम्यान नफा राहिला तरच व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रीत केलं जाणार असल्याचे कंपनीने सांगितले. सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीश मूर्ती यांनी, पुढच्या वर्षीच्या प्रारंभीच्या महिन्यांमध्ये कंपनी भांडवली बाजारात आयपीओच्या माध्यमातून उतरणार असल्याचे सांगत नुसता नफ्याचाच विचार नसून यातून विकासाची संधीही शोधण्याचा कंपनीचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.

Advertisements

Related Stories

ओला वित्त सेवा संस्थेत करणार गुंतवणूक

Amit Kulkarni

मोटोरोलाचा वन फ्यूजन प्लस बाजारात

Patil_p

डिशवॉशर विक्रीसाठी गोदरेजचे प्रयत्न

Patil_p

हवाई इंधन दरात 16 टक्के वाढ

Patil_p

आयसीआयसीआय बँकेची ‘कार्डलेस ईएमआय’ सुविधा लाँच

Patil_p

ईव्ही बॅटरीच्या हिस्सेदारीत कोरियन कंपन्यांचा दबदबा

Patil_p
error: Content is protected !!