तरुण भारत

चोवीस तासात कोरोनाचे 12 बळी

बळींची एकूण संख्या 419 मंगळवारी 709 कोरोनामुक्त 381 रुग्णांची भर  

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

मंगळवारी कोरोनामुळे 12 जणांचे बळी गेले असून त्यापैकी एकाचा मृत्यू रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाला तर दुसऱयाचा मृत्यू डिस्चार्ज घेतल्यानंतर घरी गेल्यावर झाला. आतापर्यंत कोरोनाचे 419 बळी झाले आहेत. मंगळवारी गोमेकॉत आठ जणांचा मृत्यू झाला तर दोघांचा मृत्यू ईएसआय रुग्णालयात झाला. काल 381 नवे कोरोनाबाधित सापडले असून सक्रिय रुग्णांची संख्या 4577 झाली आहे तर 709 जणांनी कोरोनावर मात केली. संशयित रुग्ण म्हणून 94 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 312 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

 राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 32,777 रुग्ण सापडले असून त्यापैकी 27,781 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. काल 1750 जणांचे नमुने तपासण्यात आले त्यापैकी 381 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह मिळाले. विविध मार्गाने गोव्यात आलेल्या तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

 विविध आरोग्य केंद्रांतील आकडेवारी पुढिलप्रमाणेः

डिचोली 162, साखंळी 366, पेडणे 144, वाळपई 225, म्हापसा 239, पणजी 267, हळदोणा 89, बेतकी 93, कांदोळी 113, कासारवर्णे 52, कोलवाळ 18, खोर्ली 195, चिंबल 199, शिवोली 199, पर्वरी 396, मये 40, कुडचडे 54, काणकोण 106, मडगाव 295, वास्को 236, बाळ्ळी 51, कासावली 107, चिंचिणी 62, कुठ्ठाळी 273, कुडतरी 45, लोटली 73, मडकई 54, केपे 59, सांगे 87, शिरोडा 18, धारबांदोडा 92, फोंडा 103, नावेली 62.

Related Stories

लता गांवकर यांना सामंज्यस मार्गाने न्याय मिळवून द्यावा

Omkar B

काणकोणात चार दिवसांचा ‘स्वेच्छा लॉकडाऊन’ यशस्वी

Omkar B

महिलांच्या सुरक्षेसाठी आता ‘पिंक फोर्स’

Amit Kulkarni

पणजी मनपावर बाबुशचेच वर्चस्व

Amit Kulkarni

अंगणवाडी विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देणार

Amit Kulkarni

नकारात्मक शक्तींनी देशाचा पाया कमकुवत केला : दिनेश राव

Amit Kulkarni
error: Content is protected !!