तरुण भारत

कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 2000 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

आज 32 जणांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज

प्रतिनिधी/ कराड

Advertisements

पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 2000 हून अधिक कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्ज देण्यात आला असून, येथे कोरोनामुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण झाले आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 32 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा आज 2006 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढय़ात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढय़ात महत्वाचे योगदान दिले. हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे 18 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगरानीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत, आज कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण करत 2006 इतका टप्पा गाठला. 

आज 32 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्च देण्यात आला. कोरोनामुक्तीची ही लढाई जिंकलेल्या रूग्णांचा सत्कार कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, योगेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

कृष्णा हॉस्पिटलने केवळ सातारा जिह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्रात कुठल्याही खाजगी रूग्णालयात कोरोनावर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मोफत उपचार कुठेही दिले गेलेले नाहीत. शिवाय इथे मृत्यूचे प्रमाणदेखील खूप कमी आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल सातारा जिह्यासाठी वरदान ठरले आहे, अशी प्रतिक्रिया कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली. 

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये रेठरे बुद्रुक येथील 73 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय पुरुष, नांदगाव येथील 25 पुरुष, रेठरे हरणाक्ष वाळवा येथील 58 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पिटल येथील 25 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 36 वर्षीय पुरुष, वाठार येथील 49 वर्षीय पुरुष, 85 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 35 वर्षीय महिला, महारूगडेवाडी येथील 28 वर्षीय महिला, आगशिवनगर येथील 56 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 55 वर्षीय पुरुष, कराड येथील 71 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 81 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 23 वर्षीय महिला, नेर्ले वाळवा येथील 60 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 60 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, विरवडे येथील 67 वर्षीय पुरुष, आसू  फलटण येथील 43 वर्षीय पुरुष, आटके येथील 58 वर्षीय महिला, सैदापूर येथील 54 वर्षीय पुरुष, बोरगाव वाळवा येथील 75 वर्षीय महिला, विद्यानगर येथील 18 वर्षीय मुलगा, शिरवडे येथील 63 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

Related Stories

आमदार शिवेंद्रराजे आणि आ.शशिकांत शिंदे एकत्र

Abhijeet Shinde

सातारा : नेले येथे चिकन वाटप करणाऱ्या दोघांवर गुन्हा

datta jadhav

महामार्गाच्या कामात पालिकेला खुदाईची घाई

Amit Kulkarni

11 नंतर सातारा होतोय चिडीचूप

Patil_p

कराड ठरले पश्चिम विभागातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर

datta jadhav

‘तरुण भारत’ने वाचक हिताची जपणूक केली

Patil_p
error: Content is protected !!