तरुण भारत

सकल मराठा क्रांतीचा कराडमध्ये मोर्चा

आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी

प्रतिनिधी/ कराड

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती त्वरित उठवण्याच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी शहरात दत्त चौकापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देत स्थगिती तातडीने उठवण्याची मागणी करण्यात आली.

सकल मराठा क्रांतीच्या वतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे मोर्चेकऱयांनी दत्त चौकात जमून तेथून प्रशासकीय इमारतीपर्यंत मोर्चा काढला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

सहकार मंत्र्यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. त्यात मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली. मराठा आरक्षणावरील स्थगिती तातडीने उठवावी, मराठा विद्यार्थी, बेरोजगार तरूणांचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत, शेतीमालाला योग्य भाव मिळण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, सारथी संस्थेबाबत सरकारने योग्य भूमिका घेऊन संस्थेचे प्रश्न सोडवावेत, मराठा आरक्षणाचा मुद्दा संपेपर्यंत पोलीस भरती स्थगित करावी, महापरीक्षा पोर्टलमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षित ठेवाव्यात, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Related Stories

वेळेपूर्वी दुकाने उघडी ठेवणाऱया चौघांवर गुन्हा

Patil_p

मुंबईच्या चाळीपेक्षा शाळेतील कॉरंटाईन परवडले

Patil_p

साताऱ्यात वाढत्या कोरोनामुक्तीने भीती कमी होतेय

Shankar_P

सातारा : तंटा मुक्तीने 80 वर्षाच्या वृध्दाचे समाधान

triratna

सातारा : कराडातील व्यापारयाला संपवण्याचा कट उधळला

triratna

वडगाव उंब्रज येथील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; आज 6 जण कोरोनामुक्त

Shankar_P
error: Content is protected !!