तरुण भारत

कोवाड अभय पत संस्थेतील चोरीप्रकरणी तीन अटक ; वीस लाखांचे दागिणे जप्त

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोवाड (ता. चंदगड) येथील अभय ग्रामीण सहकारी पत संस्थेमध्ये झालेल्या धाडसी चोरीप्रकरणी गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघा चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील 20 लाख रुपये किंमतीचे 390 ग्रॅम वजानेचे सोन्याचे दागिणे जप्त केले. महेश उर्फ पिंटू सुबराव कोले (वय 37, रा. नेसरी रोड, कोवाड, ता. चंदगड) त्यांचे साथिदार सुनिल उर्फ जान्या रामा तलवार (वय 22, रा. रणजीतनगर, कोवाड), संतोष उर्फ राजू ज्ञानेश्वर सुतार (वय 25, रा. सुतार गल्ली, चिंचणे, ता. चंदगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती नुतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. यावेळी गडहिंग्लज विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सायबर पोलीस ठाण्याचे संजय मोरे उपस्थितीत होते. 

Advertisements

पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, पंधरा दिवसापूर्वी कोवाड येथील अभय ग्रामीण सहकारी पत संस्थेच्या दरवाज्याचे कुलुप तोडून चोरटÎांनी आत प्रवेश केला. संस्थेचे लॉकर गॅस कटरने कट करुन, त्यामधील सुमारे 750 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे चोरुन नेले होते. या चोरीच्या घटनेची चंदगड पोलिसात नोंद झाली आहे. या चोरीचा चंदगड पोलिसांच्या बरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्याचे पथकाने समांत्तर तपास सुरु केला होता. तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवलदार श्रीकांत मोहिते यांना या पत संस्थेमध्ये झालेली चोरी ही कोवाड येथील नेसरी रोड राहणारा महेश उर्फ पिंटू कोले यांने केल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, हवलदार श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, विजय गुरखे, किरण गावडे, विठ्ठल मणिकेरी, प्रदिप पवार, संजय पडवळ, उत्तम सडोलीकर आदीच्या पथकाने शोध घेवून त्याला अटक केली. त्यांच्याकडे या पत संस्थेमध्या झालेल्या चोरीचा कसून तपास सुरु केला.

तपासा दरम्यान महेश उर्फ पिंटू कोलेने या पत संस्थेत साथिदार सुनिल उर्फ जान्या तलवार, संतोष उर्फ राजू सुतार या दोघांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. यावरुन त्या दोघांचा शोध घेवून त्यांना अटक केली. त्यासर्वाच्याकडे केलेल्या तपासात या पत संस्थेमध्ये चोरी केलेले दागिणे हे महेश उर्फ पिंटू कोलेच्या रहत्या घरात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. सुमारे 20 लाख रुपये किंमतीचे 390 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे जप्त केले.

Related Stories

भोगावतीचे पाणी उभ्या पिकात,शेतकरी आर्थिक अडचणीत

Abhijeet Shinde

सांगली : ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णांत घट

Abhijeet Shinde

कोल्हापूर : प्रभागातच ऑन दी स्पॉट लसीकरण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : आरोग्य मंत्र्यांशी चर्चेनंतर लॉकडाऊनचा निर्णय : मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

‘त्या’ वन अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई – जिल्हाधिकारी

Sumit Tambekar
error: Content is protected !!