तरुण भारत

शाळांसाठी मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याच्या सूचना

प्रतिनिधी / बेळगाव

सरकारने शाळा आणि वर्ग सुरू झाल्यानंतर काळजी घेण्यासाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) म्हणजेच मार्गदर्शक प्रणाली ठरवून दिली आहे. याबद्दल सरकारने आमदार, खासदार, शिक्षक संघटना आणि शिक्षणतज्ञ यांच्याकडून सूचना व मते मागविली आहेत. दरम्यान मार्गदर्शक प्रणालीबाबत शाळांनी तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या मार्गदर्शक प्रणालीत वेळापत्रक, कोविड-19 बाबतची दक्षता, निर्जंतुकीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. बऱयाच शाळा क्वॉरंटाईन सेंटर म्हणून वापरल्यामुळे त्यांचे निर्जंतुकीकरण, शाळांतील पाण्याच्या टाक्मया क्लोरीनने स्वच्छ धुवून कोरडय़ा कराव्यात, असेही स्पष्ट केले. शाळा सुरू होईपर्यंत ऑनलाईन वर्ग सुरूच राहतील. विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत.

Advertisements

शाळांनी घ्यावयाची काळजी

 • एका बाकावर फक्त दोनच विद्यार्थी असावेत.
 • शाळेच्या प्रवेशद्वारापाशी तीन फूट अंतरावर मार्किंग करावे.
 • शाळेमध्ये हात धुण्याची सुविधा आणि सॅनिटायझर असावे.
 • थर्मल स्क्रिनिंग करून आजारी विद्यार्थ्यांना परत पाठवावे
 • प्रत्येक विद्यार्थ्याने दोन मास्क आणावेत.
 • दर तीन तासाला मास्क बदलावेत
 • सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना कोविड-19 चे नियम समजून द्यावेत.
 • शालेय बसमध्ये निम्मेच विद्यार्थी असावेत.
 • बसचे निर्जंतुकीकरण दररोज करावे.
 • पालक, भेटकर्ते, शाळा समिती सदस्य यांना फक्त कार्यालयातच प्रवेश द्यावा.
 • योग, प्राणायाम यांचा सराव करून घ्यावा.
 • प्रत्येक शाळांमध्ये आरोग्य क्लब स्थापन करून प्रत्येक वर्गावर दोन विद्यार्थ्यांना वर्ग नियंत्रणासाठी वर्ग प्रमुख म्हणजेच मॉनिटर म्हणून नेमावे.

Related Stories

वडगाव मंगाई देवीची यात्रा सलग दुसऱया वषी रद्द

Amit Kulkarni

मिरवणुकांना परवानगी नाहीच

Patil_p

गणेशपूर स्मशानभूमिची आमदार पुत्राकडून साफसफाई

Amit Kulkarni

गोवावेस येथील कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू

Amit Kulkarni

विणकराचा मुलगा ‘सुपर डान्सर’च्या मंचावर

Omkar B

कर्नाटक : राज्यात पाच लाख कोटींची गुंतवणूक शक्य : मंत्री शेट्टर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!