तरुण भारत

रियलमी नार्जोला दमदार प्रतिसाद

 नवी दिल्लीः रियलमीने आपल्या पहिल्याच सेलमध्ये नार्जो 20 या नव्या स्मार्टफोनच्या विक्रीत विक्रम केला आहे. पहिल्याच सेलमध्ये रियलमीने 1.3 लाख नार्जो फोन्स विक्री केले आहेत. येणाऱया काळात 50 लाख नार्जो फोन्स विकण्याचे उद्दिष्ट कंपनीने समोर ठेवले आहे. भारतातील युवकांना हा फोन पसंत पडला आहे. कंपनीने 23 सप्टेंबरला विशेषत: युवकांना समोर ठेऊन नार्जो सिरीजअंतर्गत स्मार्टफोन लॉन्च केला होता.

आजच्या आधुनिक युगासाठी उपयुक्त असणारा प्रोसेसर या स्मार्टफोनला असून फास्ट चार्जिंग आणि उत्तम कार्यक्षमतेची बॅटरी या वैशिष्टय़ांमुळेच युवकांना हा फोन आवडला असल्याचे सांगण्यात येते.

Advertisements

Related Stories

ओप्पोकडून स्लाइड फोनसह उपकरणे सादर

Patil_p

फ्लिपकार्ट आता करणार नेपाळमध्ये विक्री

Patil_p

तक्रारीनंतर ऍपलवर 11 कोटी डॉलर्सचा दंड

Patil_p

तेजीचा ‘लॉक’ लागेल?

Patil_p

लोढा डेव्हलपर्सचा येणार आयपीओ

Amit Kulkarni

अंबुजा सिमेंटचा तिमाही नफा वधारला

Patil_p
error: Content is protected !!