तरुण भारत

पित्तशूल आणि ऍलोपॅथी

पित्तशूल आणि ऍलोपॅथी

बिलिअरी कोलिक अर्थात पित्तशूल हा आजार पित्तखडय़ांसंबंधी आहे. पित्तखडा होण्याच्या कारणांना नियंत्रित करून हा आजार रोखला जाऊ शकतो.

याच्या कारणांमधील आनुवंशिकता, तसेच वाढत्या वयातील गर्भावस्था हे जीवनाचे सामान्य भाग आहेत. याचप्रकारे लठ्ठपणा आणि उच्च फॅट्स असलेला आहार घेणेसुद्धा नुकसानकारक असते. रजोनिवृत्तीमधील
महिला, ज्या एस्ट्रोजन हार्मोन्सची चिकित्सा घेत आहेत त्यातही पित्तखडा आणि बिलिअरी कोलिक होण्याची अधिक शक्यता असते.

या आजारावर उपचारादरम्यान सर्वप्रथम डॉक्टर वेदना निवारक औषधे देतात आणि आपणास फॅट्समुक्त आहार घेण्यास प्रोत्साहित करतात.

आजार जर गंभीर असेल आणि वारंवार पोटदुखी होत असेल, तर सर्जरी करून पित्ताशयाची पिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.

या प्रक्रियेत छोटय़ा छेंदाच्या माध्यमाने पित्ताशयाची पिशवी काढली जाते. या प्रक्रियेसाठी सामान्यपणे केवळ काही वेळेसाठी हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता असते. काही लोकांना ऑपरेशननंतर एकाच दिवसात घरी सोडले जाते.

याखेरीज रोगाची लक्षणे तपासल्यानंतर चिकित्सक एक शारीरिक परीक्षा करून रूग्णाच्या पोटाच्या वरील उजव्या भागावर विशेष लक्ष देऊन तपासणी करतात.

अल्ट्रासाउंड प्रक्रियेने पोटाचे फोटो घेतले जातात. रक्तपरीक्षणही केले जाऊ शकते. खास करून आपणास ताप असेल, आणि सतत पोटदुखी होत असले तर रक्तपरीक्षणही केले जाते.

डॉ. माहेश बरमदे

Related Stories

पित्ताशयाचा खड्यांचा सशत्रक्रियेनंतर

Amit Kulkarni

एमएमआर लसः नवा दिलासा ?

Omkar B

धोका ‘ब्लॅक फंगस’चा

Omkar B

गांधीजींचा पथ्याहार

Omkar B

शून्य मुद्रा

Omkar B

वर्कआउट नंतर प्रोटीन खाताय

Amit Kulkarni
error: Content is protected !!