तरुण भारत

ट्रेडमिलवर धावताना…

गेल्या काही वर्षांत वाढलेला ‘हेल्थ कॉन्शसनेस’ कोरोनाने परमोच्च पातळीवर नेला आहे. हल्ली घराघरांमध्ये लोक व्यायामाबाबत आणि आहाराबाबत कमालीचे जागरुक झाले आहेत. प्राणायाम, योगा, अनुलोम विलोम याबरोबरीने जॉगिंग, चालणे, पळणे याला बहुतांश जण प्राधान्य देत आहेत.

जिममध्ये किंवा घरी असणार्या ट्रेडमिलवर व्यायाम करण्याने स्टॅमिना वाढतो, चरबी कमी होते,
फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते हे सर्वांनाच माहीत आहे. तथापि, ट्रेडमिलवर चालताना कधीही मोबाईलचा वापर करू नये. बोलण्याच्या नादात तोल जाऊन अपघात होऊ शकतो.

Advertisements

ब्लडप्रेशर, दमा, हृदयविकार, जास्त तीव्रतेचा मधुमेह हे आणि यांसारखे विकार असलेल्या रूग्णांनी कार्डिओ ट्रेनिंग करताना शौर्य गाजवण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने, तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच लो इंटेन्सिटी म्हणजेच कमी स्पीडवर कार्डियो ट्रेनिंग करावे.

सायकलवर व्यायाम करताना सीट थोडी उंचावर ठेवावी. पायडल कमी अंतरावर असल्यास गुडघे जास्त वाकलेले राहतात. त्यामुळे गुडघ्यांना इजा पोहोचू शकते.

सायकल चालवताना वर्तमानपत्र, मॅगेझीन अथवा इतर कुठलेही वाचन करू नये. अशाने व्यायामावर लक्ष राहत नाही. ङट्रेनिंग संपल्यानंतर कूल डाऊन करायला विसरू नये किंवा टाळाटाळ करु नये.

Related Stories

रजोनिवृत्तीचे दुष्परिणाम

tarunbharat

ओआरएसची संजीवनी

Amit Kulkarni

मेंदूला नाही म्हातारपण

Omkar B

वाढतोय स्तनांचा कर्करोग

Amit Kulkarni

नवा इशारा आणि आपण

Omkar B

हे गैरसमज जाणून घ्या

tarunbharat
error: Content is protected !!