तरुण भारत

किडनीविकार ओळखण्यासाठी….

किडनी रोगांचे निदान होणे गरजेचे

किडनीच्या आजाराचे वेळीच निदान न झाल्यास या रोगाचे गांभीर्य वाढत जाते. किडनी फेल होण्याचा धोका राहतो. याच्या उपचारासाठी डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता असते.

किडनी रोगांबरोबरच  हृदयरोग अथवा हार्ट ऍर्टक यांसारख्या अन्य जटिल समस्याही उत्पन्न होऊ लागतात. यामध्ये रुग्णाचा अकाली मृत्यूही होऊ लागतात. हात-?ायांवर चकते पडतात. तसेच मेंदूची क्षति होण्याचीही शक्यता राहते. हे टाळण्यासाठी किडनीशी संबंधित तपासण्या गरजेच्या ठरतात. कारण वेळीच निदान झाल्यास पुढील धोका टाळणे शक्य होते. 

रक्त – रक्तातील क्रिएटिनिनचा स्तर पाहण्यासाठी साधारण तपासणी केली जाते. या तपासणीतून किडनीच्या कार्यक्षमतेचा अंदाज लावला जाऊ शकतो.

युरिन – मूत्रातील क्रिएटिनिन आणि अल्ब्यूमिनसाठी ही तपासणी केली जाते.

स्किनिंग – जे रुग्ण किडनी रोगाच्या गंभीर स्थितीत आहेत, त्यांचे स्किनिंग करणे अत्यंत जरूर असते. यामध्ये क्रिएटिनिन आणि युरियाचे ऍनालिसिस केले जाते. जेणेकरून किडनीच्या कार्यक्षमतेचा शोध घेतला जाऊ शकतो.

जे लोक लठ्ठपणाने पीडित आहेत आणि धुम्रपान करतात; तसेच  कुटुंबात मधुमेह अथवा उच्च रक्तदाबाचा पूर्वेइतिहास असणारे 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक यांच्याबाबत या तपासण्या गरजेच्या ठरतात.

सिस्टिक किडनी रोग्यांच्या कुटुंबियाची सोनोग्राफी केली जाऊ शकते. या रोगाच्या प्रभावी इलाजासाठी सुरूवातीच्या अवस्थेतच या रोगाचे निदान होणे अत्यंत जरूरीचे असते.

– डॉ. संतोष काळे

Related Stories

मेडिटेशन का गरजेचे ?

omkar B

विकार मूत्राशयाचे

omkar B

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी…

omkar B

धनुरासनाचे फायदे

tarunbharat

उन्हाळ्यातील नेत्रदक्षता

tarunbharat

टेस्टोस्टेरॉनची कमरता असल्यास

omkar B
error: Content is protected !!