तरुण भारत

कोकण मार्गावर २ ऑक्टोबर पासून राजधानी एक्सप्रेस धावणार

प्रतिनिधी / खेड

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची धडधड थांबली होती. २६ सप्टेंबरपासून दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस धावू लागल्याने प्रवाशी सुखावलेले असतानाच २ ऑक्टोबरपासून निजामुद्दीन-मडगाव राजधानी एक्सप्रेसही धावणार असल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

Advertisements

कोकण मार्गावर शनिवारपासून धावणारी राजधानी एक्सप्रेस शुक्रवारी / शनिवारी निजामुद्दीन येथून सकाळी ११.३५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २.२० वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून रविवारी / सोमवारी सकाळी ११ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता निजामुद्दीनला पोहचेल. ही एक्सप्रेस ३० ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहे.

१ नोव्हेंबरपासून राजधानी एक्सप्रेस नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. शुक्रवार / शनिवारी सकाळी ११.३५ वाजता निजामुद्दीन येथून सुटून दुसऱ्या दिवशी १२.५० वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सकाळी १० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता निजामुद्दीनला पोहचेल. २० डब्यांची राजधानी एक्सप्रेस कोटा, वडोदरा, सुरत, पनवेल, रत्नागिरी आदी स्थानकावर थांबणार आहे.

Related Stories

गुटखा जोमात गाव कोमात

triratna

कोल्हापूर : राजू शेट्टींनी आमदारकीसाठी ताळतंत्र सोडले

triratna

सांगली : खानापूर तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

triratna

‘लाचलुचपत’कडून वर्षभरात 13 लोकसेवकांवर कारवाई

Patil_p

शिवरायांचा पुतळा भोसले उद्यानासमोर

NIKHIL_N

महसूल दिनी तळकट मंडळ अधिकाऱ्यांचा सत्कार

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!