तरुण भारत

हाथरस येथे पायी निघालेल्या राहुल गांधींना यूपी पोलिसांकडून अटक

  • यूपी पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की


ऑनलाईन टीम / उत्तर प्रदेश :


उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले होते. मात्र त्याआधीच जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. 

Advertisements


राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या गाड्यांचा ताफा अडवल्यानंतर दोघेही पायी चालत निघाले. पायी चालत जात असताना राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांकडून कलम 144 अंतर्गत कारवाई करत राहुल गांधी यांना अटक करण्यात आली आहे.


या सर्व प्रकारानंतर बोलताना राहुल गांधी म्हणाले, मला पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे आणि मला कोणीही रोखू शकत नाही, असे म्हणत राहुल आणि प्रियांका यांचा यमुना एक्स्प्रेस वेवर ठिय्या मांडला आहे. 


प्रियांका गांधी म्हणाल्या, हाथसरला जाण्यापासून आमची अडवणूक केली जात आहे. पण कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही हाथसरला जाणार. 


कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढत असताना अशाप्रकारे अशा प्रकारे इथे येणे चुकीचे आहे, अनेकांनी मास्क घातले नाही आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतली आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कारातील 22 वर्षीय दलित तरूणीचा बुधवारी सकाळी दिल्लीमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पिडीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Related Stories

राज्यात हजारो कोटींची गुंतवणूक होणार

Patil_p

‘पेरियार’संबंधी टिप्पणी, तामिळनाडूमध्ये वादंग

Patil_p

‘पोषण’ माध्यान्ह आहार योजनेला कालावधीवाढ

Patil_p

12 वर्षांनी भावाबहिणीने उधारीची केली परतफेड

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

Tauktae Cyclone : नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!