तरुण भारत

जम्मू : पाकिस्तानकडून गोळीबार सुरू; दोन जवान शहीद तर चारजण जखमी

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानने गुरुवारी सकाळी कृष्णा घाटीमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत.

 
पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांकडून देखील प्रत्युत्तर दिले जात असून, दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू आहे. कृष्णा घाटी मध्ये झालेल्या या गोळीबारात लान्स नायक करनेल सिंह शहीद झाले आहेत. तर जखमींना आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


याबाबत माहिती देताना श्रीनगरमधील संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया म्हणाले की, कुपवाडच्या नौगाम सेक्टरमध्ये गुरुवारी सकाळी पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला. त्यांनी मोटार्डही डागले.

Related Stories

सातारा : कोरोनाचा तेरावा आठवडा जास्त दाहक : जिल्ह्यात भयकंप

triratna

आशा वर्कर्सच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ; अमित ठाकरे व अजित पवार भेट यशस्वी

pradnya p

घरपोच सिलिंडरसाठी आता ‘ओटीपी’ अत्यावश्यक

Patil_p

इम्रान खान यांची होणार कोरोना टेस्ट

prashant_c

चीन दूतावासाबाहेर तैवानशी संबंधित फलक

Patil_p

चिन्मयानंद यांच्यावर आरोप करणाऱया युवतीचे घुमजाव

omkar B
error: Content is protected !!