तरुण भारत

महाराष्ट्रात आतापर्यंत 23 हजार 548 पोलिसांना कोरोनाची बाधा 

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 188 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर एकाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 23 हजार 548 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 247 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 23,548 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2583 पोलीस अधिकारी आणि 20,965 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 20 हजार 345 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 2195 पोलीस अधिकारी आणि 18,150 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 


सद्यस्थितीत राज्यात 2956 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 363 पोलीस अधिकारी आणि 2593 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 247 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 25 पोलीस ऑफिसर आणि 222 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

Related Stories

प्रशासकीय यंत्रणेकडून रत्नागिरी शहर सील

triratna

कोल्हापूर : ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

triratna

पॉझिटीव्ह गर्भवती महिलेला रूग्णालयात जाण्यास नकार

triratna

घरोघरी घटस्थापना करून नवरात्रोत्सवास प्रारंभ

Patil_p

पुलाची शिरोली कार्यालयाला अखेर मिळाला कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता

triratna

शिवजयंती साधेपणाने आणि उत्साहात साजरी करा : उपमुख्यमंत्री

pradnya p
error: Content is protected !!