तरुण भारत

मजगाव, स्टेशनरोड येथे मटका अड्डय़ांवर छापे

सहा जणांना अटक, उद्यमबाग, खडेबाजार पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मजगाव, स्टेशन रोड येथील दोन मटका अड्डय़ांवर छापे टाकून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी उद्यमबाग व खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 18 हजार 720 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली उद्यमबागचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुनशी, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

उद्यमबाग पोलिसांनी मजगाव येथे अब्दुल मुनाफ तिगडी (रा. रायण्णानगर, मजगाव), सुरेश करेण्णावर (रा. मच्छे), वसीम हुक्केरी (रा. रुक्मिणीनगर), या तिघा जणांना अटक करुन 13 हजार 570 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. तर खडेबाजार पोलिसांनी मेहबुब शिलेदार (रा. न्युगांधीनगर), जाहीर सनदी, शमसुद्दीन नाईक (दोघेही रा. अमाननगर) या दोघा जणांना अटक करुन 5 हजार 150 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.

Related Stories

नार्वेकर गल्ली जोतिबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Patil_p

शिक्षकच करताहेत शाळेची स्वच्छता

Omkar B

बसस्थानकात आसनाअभावी प्रवाशांची गैरसोय

Omkar B

कोरोना योद्धय़ांच्या सवलती काढून घेतल्या

Patil_p

बीबीसी बेकरीच्या उद्यमबाग शाखेचे उद्घाटन

Patil_p

जिल्हा पोलिसांकडून एमएलएम कंपन्यांना वेसण

Amit Kulkarni
error: Content is protected !!