तरुण भारत

पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधी, लालबहादूर शस्त्रींना आदरांजली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती. त्यानिमित्त आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना, तर विजय घाटावर शस्त्रीजींच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. तसेच त्यांच्या स्मृती जागवल्या. 

Advertisements

देशाचे जनक महात्मा गांधी यांची आज 151 वी जयंती आहे. भारतीय इतिहासातील सर्वात प्रेरणादायी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. देशाला स्वातंत्र्य देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनीच आपल्याला इंग्रजांविरुद्ध लढण्याचा मार्ग दाखवला. देशवासियांना त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करण्याचा संकल्प करण्यास सांगितले आहे. तर शस्त्री हे साधेपणाने जनक होते, असे मोदी यावेळी म्हणाले. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही महात्मा गांधी आणि शस्त्रींना अभिवादन केले आहे.

Related Stories

राज्यपालांची भूमिका मार्गदर्शक अन् मित्रासारखी

Amit Kulkarni

सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येचे त्रिशतक पार

Abhijeet Shinde

आरोग्य हा नागरीकांचा मूलभूत अधिकार

Patil_p

मुंबईत आजपासून तीन दिवस ‘वॉक इन’ लसीकरण

Rohan_P

माजी न्यायाधीश कर्णन यांना अटक

Omkar B

लडाखमध्ये जवानांसाठी उबदार सौरतंबू!

datta jadhav
error: Content is protected !!