तरुण भारत

एक रुपयाच्या दंडाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

न्यायालयीन अवमानाप्रकरणी झाला होता दंड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले वकील प्रशांत भूषण यांनी शिक्षेदाखल ठोठावण्यात आलेल्या एक रुपयाच्या दंडाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत भूषण यांनी 31 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

दंडाची रक्कम भरल्यानंतर प्रशांत भूषण यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्याचे म्हटले होते. यापूर्वीही भूषण यांनी दोन ट्विटद्वारे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या निर्णयालाही आव्हान दिले आहे. दोषी ठरविण्याचा कायद्यात अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी याचिका दाखल करताना सांगितले होते.

सर्वोच्च न्यायालय आणि सरन्याधीश एस.ए. बोबडे यांच्यावर टीका करणाऱया ट्विटसाठी भूषण यांना गुन्हेगारी अवमानाप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाने 31 ऑगस्ट रोजी शिक्षेच्या स्वरुपात एक रुपयाचा दंड ठोठावला होता.

Related Stories

रामलल्लाचे आता घरबसल्या दर्शन

Patil_p

काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार

Patil_p

कोरोना योद्ध्यांसाठी सेना दलातर्फे उद्या रुग्णालयांवर होणार पुष्पवृष्टी

pradnya p

बाबरी विध्वंस अपघात; कट नव्हे!

Omkar B

धक्कादायक! लुडो खेळताना खोकला, म्हणून मित्राने झाडली गोळी

prashant_c

कोचीतील चौथी इमारतही जमीनदोस्त

Patil_p
error: Content is protected !!