तरुण भारत

मोटारचा शॉक लागून शिरोळ येथील एकाचा मृत्यू

प्रतिनिधी / शिरोळ

मोटारीची वायर प्लगमध्ये लावत असताना शॉक लागून शिरोळ येथील सुशांत श्रीकांत शिंगाडे (वय १६, रा. पंचायत समिती निवासस्थानाजवळ) याचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी पंजाबराव मुरमुरे यांनी दिली असून शिरोळ पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सुशांत शिंगाडे हा आपल्या घरात पाण्याच्या मोटारीची वायर प्लगमध्ये बसवत होता. त्यावेळी त्याला विजेचा शॉक लागला असता तो जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी शिरोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : पेठ वडगावात कोविड रुग्णालय चार दिवसात सुरु होईल – खासदार धैर्यशील माने

Abhijeet Shinde

सात महिन्यांनी धावली हरिप्रिया..!

Abhijeet Shinde

पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघाताबाबत ठोस निर्णय व्हावा

Sumit Tambekar

कोल्हापूर उपनगरात कोरोना लसीकरण केंद्रे सुरू करा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राधानगरीत सर्वाधिक तर शाहूवाडीत सर्वात कमी लसीकरण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : बिद्रीकडून “गरज सरो वैद्य मरो” धोरण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!