तरुण भारत

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 75 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संखेने 75 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 75 लाख 49 हजार 323 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 13 हजार 524 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

अमेरिकेत शुक्रवारी 51 हजार 403 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 864 जणांचा मृत्यू झाला आहे. 75.49 लाख कोरोना रूग्णांपैकी 47 लाख 76 लाख 824 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 25 लाख 58 हजार 975 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 166 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10 कोटी 95 लाख 70 हजार 446 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 8 लाख 26 हजार 690 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 16 हजार 075 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 7 लाख 97 हजार 144 जणांना बाधा झाली असून, 16 हजार 345 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 96 हजार 314 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 289 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा

Patil_p

‘आयएस’चा रॉकेटहल्ला अमेरिकेन यंत्रणेने रोखला

Patil_p

नेपाळमधील राजकीय संकट लांबणार

Patil_p

स्वित्झर्लंड चिंताग्रस्त

Patil_p

फोन टॅपिंगसाठी रश्मी शुक्लांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा सवाल

triratna

कोकण मार्गावर धावली ‘मोदी एक्सप्रेस’

triratna
error: Content is protected !!