नवी दिल्ली
मारूती सुझुकी कंपनीने आपल्या लोकप्रिय जुन्या मॉडेल्सना पुन्हा नव्या रुपात आणण्याचे ठरवले आहे. यात लोकप्रिय आल्टो ही गाडी लवकरच नव्या स्वरूपात बाजारात दाखल झालेली पाहायला मिळणार आहे. यासोबत वेगनआर व विटारा ब्रिझा या गाडय़ाही नव्या रूपात दाखल होणार आहेत. नवी आल्टो ही गाडी पहिल्यापेक्षा जास्त लांबीची असणार असून दमदारही असेल. ही गाडी डिसेंबर 2020 मध्ये भारतात उतरवली जाणार असल्याचे समजते. भारतात सर्वात जास्त विकली जाणारी ही कार आहे.