तरुण भारत

ऍमेझॉनकडून एक लाख जणांना रोजगार

मागणी पूर्ततेसाठी उमेदवार भरती : 2025 पर्यंत 10 लाख जणांना संधी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

ऍमेझॉन इंडीयाने उत्सवी काळाच्या आधीच देशात सुमारे एक लाख जणांना नोकरी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवसायातही कंपनीची घोडदौड असून भारतात त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

 येणाऱया काळात भारतात विविध उत्सव-सण साजरे केले जाणार आहेत, त्या अनुषंगाने विविध वस्तूंना मागणीदेखील वाढण्याची शक्मयता लक्षात घेऊन ऍमेझॉनने नव्या उमेदवारांची भरती करून घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

 विक्री व्यवसायाचे जाळे अधिकाधिक वाढवण्याबरोबरच ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी या नव्या उमेदवारांची मदत घेतली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. विविध वस्तूंची ऑर्डर घेणे, त्यांचे पॅकेजिंग करणे, वस्तु पाठवणे आणि सुरक्षित वस्तू पोहोच करणे या कामांसाठी नव्या उमेदवारांची भरती केली जात आहे. वस्तूंचा पुरवठा लवकरात लवकर व्हावा यासाठी या विभागातही प्रशिक्षित कर्मचारी नेमले गेले आहेत. आपल्या व्यवसायाच्या विस्ताराच्या माध्यमातून ऍमेझॉनला 2025 पर्यंत भारतात 10 लाख जणांना रोजगार द्यावयाचा आहे. यादृष्टीने भविष्यकालीन योजनेचे नियोजन कंपनीने केले आहे. म्हणूनच येणाऱया काळात ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी  उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. 

Related Stories

लावा कंपनी आणणार आयपीओ

Amit Kulkarni

तेजी टिकवण्यात बाजाराला अपयश

Patil_p

हवाई प्रवास महागण्याचे संकेत

Patil_p

बेजोसना मागे टाकत बर्नार्ड अरनॉल्ट बनले श्रीमंत व्यक्ति

Patil_p

एफडीआयमध्ये 13 टक्क्मयांची वाढ

Patil_p

जागतिक बाजारातील संकेतामुळे सेन्सेक्स तेजीत

Omkar B
error: Content is protected !!