तरुण भारत

मेड इन इंडिया रेल्वे इंजिन तयार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

प्रवासी रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सने एरोडायनॅमिक डिझाईन असलेले डब्ल्यूएपी-5 पॅसेंजर इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन तयार केले आहे. यापुढे प्रवाशी रेल्वे गाड्यांचा वेग ताशी 160 किमी केला जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

पहिल्या बॅचअंतर्गत दोन इंजिन विकसित करण्यात आली असून, त्यांचे क्रमांक 35012 आणि 35013 असे आहेत. या इंजिनामुळे हायस्पीड एअर ड्रेग्सही कमी होतील. हे इंजिन प्रवासी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह ऊर्जा कार्यक्षमता आणि गतिमानदृष्ट्या स्थिर आहे. त्यांची क्षमता 6000 हॉर्सपॉवर असेल, ज्यामुळे ताशी 160 किमी वेग पकडणे शक्य होईल. त्याचबरोबर या इंजिनांमध्ये आयजीबीटी आधारित पर्पल्सन प्रणाली असेल आणि प्रीमियम पॅसेंजर ट्रेनमध्ये पुश-पुल मोडवर काम केले जाईल.

दिल्ली-कोलकाता आणि दिल्ली-मुंबई मार्गावरील गाड्या ताशी 160 किमी वेगाने धावतील, असे रेल्वेने यापूर्वीच जाहीर केले आहे. या मार्गांवर रेल्वे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) बांधत आहे, जे मार्च 2022 पर्यंत पूर्ण होईल. यामुळे ट्रॅक या गाड्यांसाठी रिकामा होणे शक्य होणार आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

Related Stories

रुग्णसंख्या वाढतीच : 138 नवे संसर्गबाधित

Patil_p

कोरोना लसनिर्मितीत आता अंबानींचेही नाव

omkar B

बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगना म्हणाली…

pradnya p

चीन दूतावासाबाहेर तैवानशी संबंधित फलक

Patil_p

कोरोनाच्या जलद चाचण्यांना स्थगिती

Patil_p

चीनमधून परतलेले 6 भारतीय देखरेखीत

Patil_p
error: Content is protected !!