तरुण भारत

अंधारी गावाने दिली सामाजिक बहिष्काराला मूठमाती

महाराष्ट्र अनिस आणि सातारा पोलीस दलाच्या समुपदेशनाला यश

प्रतिनिधी / सातारा

कास तलावाच्या पासून पुढे तीन किलोमीटर अंतरावर बामणोली जलाशयाच्या जवळ वसलेले अंधारी हे शंभर घरांचे गाव . या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावात गेल्या काही वर्षांच्यामध्ये दहा पेक्षा अधिक अंतर जातीय विवाह झालेले आहेत. ह्या मधील बरीचशी मुंबई येथे राहणारी जोडपी हि टाळेबंदीच्या कालखंडात गावी परत आली. आंतरजातीय विवाह केल्याने गावाकीने त्याच्याशी वेगळे पणाची वागणूक सुरु केली होती. गावाच्या सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमात त्यांना सहभागी होऊ न देणे तसेच जवळच्या नातेवाईकांचे लग्न, मृत्यू ह्या मध्ये त्यांना सहभागी होऊ न देणे असे प्रकार घडू लागले होते. काही ठिकाणी वडिलांच्या मृत्यू नंतर मुलाला धार्मिक कार्यात सहभाग नाकारण्यासाठी दबाव आणण्याचे प्रकार देखील समोर आले होते. श्री चंद्रकांत शेलार मेढा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली .तसेच महाराष्ट्र अनिस सातारा शाखे कडे देखील तक्रार केली.

गुन्ह्याचे सामाजिक स्वरूप लक्षात घेता सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस स्टेशन चे पोलीस इंन्स्पेकटरश्री राठोड आणि महाराष्ट्र अनिस तर्फे डॉ हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार , शंकर कणसे,भगवान रणदिवे आणि प्रशांत जाधव ह्यांनी ह्या विषयी गावकर्यांशी बैठक घेवून त्यांना शासनाने केलेल्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्या संबंधी सविस्तर मारादर्शन केले. ह्या विषयी प्रबोधन करून गावाचे सरपंच श्री शेलार यांना म अनिस तर्फे संविधानाची प्रत भेट देण्यात आली. गावातील जेष्ठ नागरिक आणि सरपंच ह्यांनी पुढाकार घेवून येथून पुढे अशा घटना गावात होणार नाहीत ह्या विषयी निर्धार व्यक्त केला.

सातारा जिल्ह्यातील विशेष करून जावली आणि पाटण ह्या तालुक्यातील अनेक गावांच्या मध्ये गावकी आणि भावकीच्या नावाच्या खाली सामाजिक बहिष्कार टाकला जात आहे. अशा पिडीत लोकांनी महाराष्ट्र अंनिस तसेच स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.

Related Stories

उमेद अभियानातील दहा लाख महिला सोमवारी रस्त्यावर उतरणार

triratna

को – 265 जातीच्या ऊसाची नोंद न घेतल्यास गाळप परवाना नाही

triratna

सामुहिक बलात्कार व दरोडा प्रकरणी पोलिसांनीच पुरावे पेरले

Patil_p

सातारा पालिकेचा 167 वा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा

Patil_p

सातारा : महामार्गावर 2 ठार ; 4 जखमी

triratna

आदी कडक शब्दात ‘डोस’ नंतर मायेचा ‘डोस’

triratna
error: Content is protected !!