तरुण भारत

बारा बलुतेदारांचे मराठा आरक्षणाला बळ

खासदार संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्शविला पाठींबा

– सकल मराठा शौर्य पीठचे अनोखे आंदोलन

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

आरक्षणाचे जनक, बहुजनांचे उद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा पगडा असणाऱया करवीर नगरीतील बारा बलुतेदारांनी मराठा आरक्षण लढÎाला बळ दिले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल मराठा शौर्यपीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनामध्ये विविध समाजांच्या प्रतिनिधीनीं पाठींबा दर्शवीला. याप्रसंगी खासदार संभाजीराजे यांनी मार्गदर्शन केले. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला.

 याप्रसंगी बोलाताना खासदार संभाजीराजे म्हणाले, आरक्षणासाठी सकल मराठा समाज गेल्या 40 वर्षांपासून लढा देत आहे. आण्णासाहेब पाटील यांच्यासह 40 तरुणांनी आरक्षणासाठी बलीदान दिले आहे. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जावू देणार नाही. सध्या काही मराठा संघटना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण पदरात पाडून घेण्यास तयार आहेत. मात्र सध्या हे आरक्षणा घेतल्यास पुढे एसईबीसी आरक्षण मिळणे कठीण जाईल. त्यामुळे आत्ता ईडब्ल्यूएस आरक्षण घेतल्यास पुढे एसईबीसी आरक्षण देण्यास काही अडचण निर्माण होणार नाही, याची खात्री सरकारने लेखी स्वरुपात मराठा समाजाला द्यावी, अन्यथा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा स्विकार समाज करणार नाही, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.

  यावेळी सकल मराठा शौर्यपीठचे प्रसाद जाधव, राजू जाधव, फत्तेसिंह सावंत, राहूल इंगवले, दादासाहेब देसाई, किशोर घाटगे, प्रकाश सरनाईक, संजय वाईकर-पवार, जिजामाता ब्रिगेडच्या सुनिता पाटील, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत बराले आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

   वकीलांना बळ देण्याची वेळ

  आरक्षणासाठी मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेतली आहे. मराठा संघटनांनकडून उद्रेकाचा इशारा देण्यात येत आहे. मात्र मराठा समाजाने सध्या संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. सध्याची लढाई हि न्यायालयीन असून ती अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे हि वेळ हत्यार घेण्याची नसून आरक्षणासाठीची बाजू मांडणाऱया वकीलांना बळ देण्याची आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

   10 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद मागे

   मराठा समाजाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय गोलमेज परिषदेमध्ये 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र कोरोना संकटामधून सध्या सर्वच क्षेत्र सावरण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंद केल्यास पुन्हा सर्वच घटकांना फटका बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले होते. त्यानुसार 10 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचे शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगत याची माहिती राज्यातील सर्व समन्वयकांना देणार असल्याचे सांगितले.

   मराठाओबीसींमध्ये ठिणगी टाकण्याचा प्रयत्न

  ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करुन याप्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा संघटना करत असल्याचे सांगून काही जणांकडून मराठा-ओबीसींमध्ये ठिणगी टाकण्याचे काम सुरु आहे. यानंतर अनेक ओबीसी नेत्यांनी भेट घेतली. मात्र मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण देण्याची कधीच मागणी केलेली नाही. एसईबीसीमधूनच आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाज ठाम आहे. त्यामुळे अशी बतावणी करुन जर कोणी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना हिसका दाखवू असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला.

   शिवाजी मंदिर आंदोलन केंद्राचे रविवारी उद्घाटन

  आरक्षणासाठी राज्यभरात होणाऱया आंदोलनाचा केंद्रबिंदू शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर असणार आहे. त्यामुळे शिवाजी तरुण मंडळाचा हॉल आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. शिवाजी मंदिर या आंदोलन केंद्राचे रविवार 11 रोजी उद्घाटन होत असल्याचे मंडळचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी सांगितले.

   बाराबलुतेदारांना दर्शविला पाठींबा

  मुस्लीस समाजातील बैतुलमाल कमिटीचे जाफरबाबा, अक्तर इनामदार, आदम बागवान, वासीम चाबुकस्वार, जाफर मलबारी, कुंभार समाजाचे मोहन माजगांवकर, ब्रह्मानंद वडणगेकर, निवास ब्रह्मपुरे, रविराज पाडळकर, चर्मकार समाजाचे गणेश वडोरे, सुनील पोवार, ख्रिश्चन समाजाचे अरुण खोडवे, मावळा शाहीर दिलीप सावंत, नाभिक समाजाचे विनायक संकपाळ, मनोज टिपुगडे, परीट समाजाचे उदय भालकर, संजय परीट, वाजंत्री समाजाचे सुनील जाधव, तेली समाजाचे शिवमुर्ती झगडे, वाणी समाजाचे संतोष लाडा आदींनी मराठा आरक्षण लढÎाला पाठींबा दर्शविला. 

Related Stories

संघटीत जनरेटय़ामुळे उरमोडीचे पाणी तारळीच्या पाटाकडे वळले

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात सक्रीय रूग्णसंख्या २ हजारांच्या आत, आज ७ मृत्यू

Abhijeet Shinde

हातखंबा येथे ट्रकची दुचाकीला धडक, वडिलांसह मुलाचा मृत्यू पत्नी गंभीर जखमी

Amit Kulkarni

अपहरणाच्या प्रयत्नात असलेल्या दोघा इसमांच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 14.03 टी.एम.सी. पाणीसाठा

Abhijeet Shinde

हातकणंगले तालुक्‍यात गुरुवार पर्यंत 93 मिलिमीटर पावसाची नोंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!