तरुण भारत

अल्टमायर, गॅस्टन, व्हेरेव्ह, रुबलेव्ह चौथ्या फेरीत

वावरिंका, बेरेटिनी, अँडरसन यांचे आव्हान समाप्त, नदाल, लॉरेन्झो, किकी बर्टेन्स यांचीही आगेकूच

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisements

रशियाचा आंद्रेय रुबलेव्ह, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, स्पेनचा नदाल, इटलीचा लॉरेन्झो सोनेगो, हय़ुगो गॅस्टन, जर्मनीचा डॅनियल अल्टमायर यांनी पेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळविले तर मॅटेव बेरेटिनी, केविन अँडरसन व स्टॅनिसलास वावरिंका यांना पराभवाचा धक्का बसला. महिलांमध्ये किकी बर्टेन्सने शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले.

जर्मनीचा पात्रता फेरीतून आलेल्या डॅनियल अल्टमायरने इटलीच्या सातव्या मानांकित बेरेटिनीला 6-2, 7-6 (7-5), 6-4 असा पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. 22 वर्षीय अल्टमायरने आधीच्या फेऱयांत फेलिसियानो लोपेझ व जॅन लेनार्ड स्ट्रुफ यांनाही हरविले होते. एखाद्या गँडस्लॅमची चौथी फेरी गाठणारा पात्रता फेरीतून आलेला तो चौथा टेनिसपटू आहे. अल्टमायरची पुढील लढत ऍगट किंवा बुस्टा यापैकी एकाशी होईल. रशियाच्या रुबलेव्हने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचे आव्हान 6-3, 6-2, 6-3 असे संपुष्टात आणले तर जर्मनीच्या व्हेरेव्हने इटलीच्या मार्को सेक्चीनाटोवर 6-1, 7-5, 6-3 अशी मात करीत आगेकूच केली. इटलीच्याच यानिक सिनरशी त्याची पुढील लढत होईल. क्लेकोर्ट मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱया नदालनेही चौथी फेरी गाठली असून त्याने इटलीच्या स्टेफानो ट्रव्हाग्लियाचा 6-1, 6-4, 6-0 असा धुव्वा उडविला. अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्दाशी त्याचा पुढील मुकाबला होईल.

अन्य एका सामन्यात जागतिक क्रमवारीत 239 व्या स्थानावर असणाऱया व येथे वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या हय़ुगो गॅस्टनने माजी विजेत्या वावरिंकाला हरवून सर्वात धक्कादायक निकाल नोंदवला. त्याने वावरिंकावर 7-6 (7-5), 6-3, 7-6 (19-17) असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. यातील टायबेक तब्बल 30 मिनिटे रंगला होता. मात्र 38 गुणांच्या टायबेकचा विक्रम त्यांना मोडता आला नाही. त्सेंगा व रॉडिक यांनी 2007 मधील ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये हा विक्रम केला होता. त्याची पुढील लढत 12 व्या मानांकित दिएगो श्वार्ट्झमन किंवा नॉर्बर्ट गॉम्बोस यापैकी एकाशी होईल. महिला एकेरीत पाचव्या मानांकित किकी बर्टेन्सने शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविताना कॅटरिना सिनियाकोव्हावर 6-2, 6-2 अशी मात केली. तिची लढत मार्टिन ट्रेविसनशी होणार आहे. ट्रेविसनने मारिया साकेरीचा पराभव करून आगेकूच केली आहे.

भारताच्या देव जावियाला कनिष्ठांच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान भारताच्या देव जावियाने प्रेंच ओपन स्पर्धेतील कनिष्ठ विभागाच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले आहे. 18 वर्षीय देवने पात्रतेतील दुसऱया सामन्यात मेक्सिकोच्या एमिलियानो गुरेरोचा 6-2, 3-6, 10-8 असा पराभव केला. त्याआधीच्या सामन्यात त्याने ब्राझीलच्या निकोलस झानेलाटोचा 0-6, 6-1, 10-4 असा पराभव केला होता. यावर्षीच्या सुरुवातीस दिल्लीत झालेल्या भारतीय टप्प्यातील प्रेंच ओपन ज्युनियर वाईल्डकार्ड प्लेऑफ सिरीजमध्ये त्याने जेतेपद मिळवून पॅरिसमधील पात्रता स्पर्धेसाठी स्थान मिळविले होते.

Related Stories

केन विल्यम्सनच्या शतकाने न्यूझीलंड भक्कम स्थितीत

Patil_p

आयपीएलसाठी 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा ‘मिनी’ लिलाव

Patil_p

राजस्थान-पंजाबचे प्रशिक्षक, दोघेही चिंतेत!

Patil_p

बॅबोस-मॅलेडेनोव्हिक महिला दुहेरीत अजिंक्य

Patil_p

भारत-बेल्जियम उपांत्य फेरीत

Patil_p

गोलंदाज प्रशिक्षकपदासाठी पारस म्हांब्रे इच्छुक

Patil_p
error: Content is protected !!