तरुण भारत

204 दिवसांमध्ये भारतात बळींचा आकडा लाखापार

ब्राझीलमध्ये 158 दिवसांचा कालावधी : अमेरिकेत 83 दिवस

2 ऑक्टोबर रोजी भारतातील कोरोनाबळींचा आकडा 1 लाखाच्या पार पोहोचला आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर आता भारत कोरोनाबळींच्या संख्येप्रकरणी जगात तिसऱया क्रमांकावर आहे. भारतात कोरोनामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूच्या 204 दिवसांनी ही संख्या 1 लाखापर्यंत पोहोचली आहे. तर ब्राझीलमध्ये हा आकडा 158 दिवसांमध्येच पोहोचला होता. तर अमेरिकेत प्रारंभिक 1 लाख मृत्यू 83 दिवसांमध्ये झाले होते.

Advertisements

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी केरळमध्ये आढळून आला होता. चीनच्या वुहान येथून परतलेल्या एका विद्यार्थ्यामध्ये विषाणूची लक्षणे दिसून आली होती. तर भारतात पहिला कोरोनाबळी कर्नाटकात गेला होता. संबंधित 76 वर्षीय इसम सौदी अरेबियातून परतला होता. पहिल्या बळीवेळी भारतात केवळ 75 रुग्ण सापडले होते. भारतात आता बळींचा आकडा 1 लाखाच्या वर गेला असताना एकूण रुग्णसंख्या 64 लाखांहून अधिक आहे. तर सद्यकाळात देशात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंचा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

भारतात कोरोनामुळे पहिला बळी 12 मार्च रोजी गेला होता, यानंतर 48 दिवसांनी बळींचा आकडा 1 हजारपर्यंत पोहोचला होता. तर पुढील 78 दिवसांमध्ये हे प्रमाण 10 पटीने वाढून 10 हजारांवर गेले हेते. पुढील 31 दिवसांमध्ये बळींचा आकडा 50 हजारापार पोहोचला होता. तर त्यापुढील 48 दिवसांमध्ये हा आकडा 1 लाख बळींपर्यंत गेला आहे.

अमेरिकेत सर्वाधिक

जगात आतापर्यंत कोरोनाचे 3 कोटी 46 लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर 10 लाखांहून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचा दर 4 टक्के आहे. कोरोनामुळे झालेल्या सर्वाधिक मृत्यूंचे प्रमाण अमेरिका, ब्राझील आणि भारतासह मेक्सिको, ब्रिटन, इटली, पेरू, फ्रान्स, स्पेन आणि इराण या देशांमध्ये आहे. 

इटलीतही प्रारंभी संकट

इटलीत प्रारंभिक काळात बळींचा आकडा अत्यंत वेगाने वाढला होता. तेथे पहिला बळी 21 फेब्रुवारी रोजी गेला होता, त्यानंतर एका महिन्यातच 4,841 जणांचा मृत्यू ओढवला होता. तर 60 दिवसांमध्ये हा आकडा 24,710 पर्यंत पोहोचला होता.

 फ्रान्समध्ये मृत्यूदर अधिक

कोरोनाने होणाऱया मृत्यूंमध्ये फ्रान्समध्ये सर्वाधिक दर आहे. तेथे कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाल्याच्या 251 दिवसांमध्ये 31 हजारांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. मृत्यूदराप्रकरणी इटली दुसऱया तर तिसऱया क्रमांकावर मेक्सिको आहे. अधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारतातील मृत्यूदर तुलनेत कमी आहे.

पेरूमध्ये संकट

लोकसंख्येच्या हिशेबाने मृत्यूदराप्रकरणी पेरू पहिल्या स्थानी आहे. तेथे दर 10 लाख लोकांमागे 983 जणांचा मृत्यू होत आहे. तर भारतात दर 10 लाख लोकांमागे 73 बळी गेले आहेत.

अमेरिकेत सर्वाधिक 2.12 लाख बळी

अमेरिकेत कोरोना महामारीमुळे 2.12 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू ओढवला आहे. तेथे कोरोनाचा पहिला रुग्ण 15 फेब्रुवारी रोजी सापडला होता. तर 29 फेब्रुवारी रोजी या विषाणूने पहिला बळी घेतला होता. तर ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1.44 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

Related Stories

बांगलादेशात आतापर्यंत 70 मंदिरांमध्ये तोडफोड

Patil_p

जगभरातील बळींचा आकडा 50 हाजारांवर

Patil_p

युएईच्या पंतप्रधानांनी घेतली लस

Omkar B

तालिबानला मान्यता मिळवून देण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान

Patil_p

एकाच फुटबॉल संघातील 25 जणांना कोरोनाची लागण

datta jadhav

‘इंटरनॅशनल डे ऑफ हॅप्पीनेस’ डे का होतो साजरा, जाणून घ्या

Patil_p
error: Content is protected !!