तरुण भारत

लिंक ओपन न झाल्याचा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना फटका

मुंबई विद्यापीठाच्या कारभारामुळे विद्यार्थी हवालदिल

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

मुंबई विद्यापीठाचा दुपारी 2 वाजता होणाऱया पेपरची लिंक 3 वाजले तरी विद्यापीठाने पाठवली नाह़ी त्यातच सकाळच्या सत्रातील पेपरची पाठवलेली लिंक उघडलीच न गेल्यामुळे परीक्षांचा भेंगळ कारभार पुन्हा समोर आला आह़े

  कोविडमुळे लांबलेल्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहेत. मात्र विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी विकसित केलेली प्रणाली काही संगणक व मोबाईल प्रणालीसाठी समर्पक नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्य़ा आता ऐनवेळी लिंक न उघडणे तसेच दुपारी 2 च्या पेपरची लिंक 3 वाजत आले तरीही न पाठवल्यामुळे विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आह़े दुपारच्या सत्रात बीए, बीकॉम आदी तृतीय वर्षाची परीक्षा होणार होत़ी  पेपर सुरु होण्याच्या काही मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना लिंक व पासवर्ड पाठवला जातो, मात्र 2 च्या पेपरची लिंक 3 वाजले तरीही पाठवण्यात न आल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले होत़े

  विद्यार्थ्यांच्या अंतिम शैक्षणिक वर्षाला मोठे महत्व आह़े सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे अंतिम वर्षाची परीक्षा होणारच, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या तणावामध्ये वाढ झाल़ी  त्यातच परीक्षेचे ऑनलाईन पेपर न उघडणे, वेळेत लिंग न मिळणे, ऍप विशिष्ट व्हर्जनला न चालणे, सर्व्हर डाऊन होणे अशा प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत़

                  विद्यापीठाची बेपर्वाई, फेरपरीक्षा घ्या!

जिह्यातील अनेक विद्यार्थ्यांना आज अंतिम वर्ष कला शाखेचे पेपर उपलब्ध झाले नाहीत. आज मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष कला शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका वेळेत प्राप्त झाली नव्हत़ी हेल्पलाई&नवरही संपर्क न झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाल़े  पेपरची वेळ दुपारी 2 असताना 3 वाजेपर्यंत प्रश्नपत्रिका उपलब्ध नाहीत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रात ही बाब दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान तांत्रिक कारणामुळे होता नये. अगर कोणाच्या बेपर्वाईचा फटका बसता कामा नये. मुलांची व्दिधा संपवण्यासाठी विद्यापीठाने तत्काळ फेरपरीक्षा घेण्याचे घोषित करावे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

Related Stories

लाकडाऊनमध्ये मासेमारीस केंद्रसरकारची परवानगी

Patil_p

शिक्षक चंद्रकांत सावंत यांचा आमदार दीपक केसरकर यांच्याकडून सन्मान

NIKHIL_N

रत्नागिरीतील 5 पोलीस अधिकारी केंद्र सरकारकडून सेवा पदकाने सन्मानित

Patil_p

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचा प्रसूती विभाग सुरक्षित

Abhijeet Shinde

कुडाळ तालुक्यातील युवकांचा मनसेत प्रवेश

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्हय़ात आणखी आठ दिवस कडक लॉकडाऊन

Patil_p
error: Content is protected !!