तरुण भारत

एकतर्फी प्रेमातून चिमुकल्याचा बळी

नराधमाच्या मुसक्या कशा आवळल्या, विवाहित प्रेमिका भेटत नसल्याच्या संतापातून युवकांचे कृत्य

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

काळजमध्ये दोन दिवसांपूर्वी रामनगर परिसरातील घरातून दहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्यानंतर खळबळ उडाली. या बाळाचे कोणी, कशासाठी अपहरण केले या चर्चेला संपूर्ण जिह्यात उधान आले. ज्या लेकराला बोलता येत नाही, धड आपल्या पायावर चालता येत नाही, की खाता येत नाही. अशा काळजाच्या तुकडय़ाचे अपहरण झाल्यानंतर आई-वडीलांवर आभाळ कोसळले. यांची तक्रार लोणंद पोलीस स्टेशन मध्ये दाखल होताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनेचे गांर्भीर्य ओळखत तपासाची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱयांवर सोपवली. आणि पोलीसांनी युद्धपातळीवर शोध मोहिम सुरू केली. अवघ्या 48 तासाच्या आत संशयित आरोपी अभिजित रामदास लोखंडे (वय 28) रा. तडवळे ता फलटण याला अटक करण्यात आली.

       दहा महिन्यांच्या ओम भगत यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना जिह्यात घडली. संशयित आरोपी रामदास लोखंडे हा बाळाच्या आईवर एकतर्फी प्रेम करत होता. त्यातून त्याने वेळोवेळी महिलेचा पाठलाग करणे, त्यांना फोन करणे व त्रास देणे, असे प्रकारही सुरू होते. असे करू नकोस म्हणून महिलेने त्याला समज दिली. तरीही त्यांने हा प्रकार थांबवला नव्हता. महिलेने कंटाळून कुटुंबियांना सांगणार असल्याचे बजावले होते. यावर चिडून संशयित अभिजीत यांने दोन दिवस आधी परिसराची सर्व माहिती घेतली. मुलाला मारायचे हा उद्देश डोळयासमोर ठेवून त्याने दि. 29 रोजी मुलाचे अपहरण करून लगेचच त्याला विहिरीत टाकून दिले. दुसऱया दिवशी बाळाच्या वडील अंघोळीसाठी पाणी घ्यायला गेले अन् बाळ पाण्यात पाहूनच त्या बापाचा थरकाप उडाला. आपल्या मुलाचा मृतदेह दुसऱया दिवशी आढळल्यानंतर नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेला भावनिक किनार असल्याने पोलीसांनाही याचा तपास करणे जिकिरीचे झाले. तरीही सातारा पोलीसांनी हे आवाहन पेलले.

 त्यानुसार पोलीसांचे एक-एक अशी तब्बल 12 पथके तैनात केली. मुलगा सापडावा यासाठी पोलिसांनी त्या बाळाचा फोटो व त्यासंबधी सर्व माहिती सोशल मिडियावर व्हायरल केली. दोन दिवस पोलिसांचा रात्रदिवस तपास सुरू असताना त्याला यश येत नव्हते. अखेर दुर्दैवाने गुरूवारी दि. 1 ऑक्टोबर रोजी घरापासून 100 अंतरावर असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. यानंतर पोलीसांनी युद्धपातळीवर शोध मोहिम सुरू केली. आसपासच्या परिसरातील लहानमुले ते जेष्ठ यांना कोणी संशयिताला ओम भगतला घेवून जाताना पाहिले का ? अशी विचारणा करण्यात आली. यानंतर प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार एक युवक व युवती त्या परिसरातून दुचाकीवरून गेल्याचे लहान मुलांकडून पोलिसांना समजले. पोलिसांनी त्यांचे वर्णन घेतल्यानंतर त्या संबंधी सीसीटीव्ही फुटेजही त्यांना मिळाले. दुसरा फोकस त्या भागात जे फिरते असतात त्यांची माहिती पोलीसांनी सुरूवात केली. तिसरा फोकस परिसरातील कोणी व्यक्ती बेपत्ता झाली आहे का ? तसेच कौटुंबिकसह इतर माहिती घेता विविध अंगलने पोलीसांनी तपासाला सुरूवात केली. अखेर तांत्रिक तपासामुळे पोलिसांचा अभिजीत लोखंडेवर फोकस निश्चित झाला. संशयित अभिजीत लोखंडे याचा भाजीपाला व दुधाच्या व्यवहारातून भगत कुटुंबियाचा परिचय होता. महिन्याचा व्यवहार यामुळे त्यांची ओळख अधिक वाढत गेली. गेल्या काही महिन्यांमध्येच त्य ही ओळख झाल्यानंतर घरीदेखील संशयित येऊन गेल्याचे समोर आले आहे. या ओळखीचा संशयिताने गैरफायदा घेतला व त्यातूनच तो एकतर्फी प्रेम करू लागला. महिला प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने त्याने हत्येचा प्लॅन केला.

Related Stories

धक्कादायक : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

Rohan_P

कांदाट बनच्या भूमीहीन शेतकऱ्यांना न्याय द्या

datta jadhav

रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगणात केले आंदोलन

Patil_p

होम आयसोलेशनसाठी रयतची महाविद्यालये ताब्यात घ्या : खा. उदयनराजे

datta jadhav

सातारा जिल्ह्यात पुन्हा उच्चांकी बाधित वाढ

datta jadhav

साताऱ्यात आज १६ डिस्चार्ज तर ५६१ नमुने पाठविले तपासणीला

triratna
error: Content is protected !!