तरुण भारत

छत्रपतींचे सेवक संघटनेकडून किल्ले अजिंक्यताऱ्यावर दुर्गसंवर्धन मोहीम

प्रतिनिधी / सातारा

किल्ले अजिंक्यतारा येथे रविवारी सकाळपासून छत्रपतींचे सेवक या संघटनेच्या मावळ्यांनी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये मुख्य महादरवाजाच्या भवतीचा परिसर, सप्तर्षी मंदिराच्या बाजूचा परिसर, पुन्हा एकदा चुणाच्या घणावरील वाढलेले गवत काढण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, महाराणी ताराबाई यांच्या स्वतंत्र्य साम्राज्याचा साक्षिदार आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी उभी केलेली स्वराज्याची चौथी राजधानी सातारकरांचा अभिमान किल्ले अजिंक्यतारा येथे रविवारी दि.4 रोजी स्वच्छता मोहिम घेऊन मुख्य महादरवाजाच्या भवतीचा परिसर, सप्तर्षी मंदिराच्या बाजूचा परिसर, पुन्हा एकदा चुणाच्या घणावरील वाढलेले गवत आणि तसेच दक्षिण महादरवाजाच्या बाजूच्या परिसरातील कचरा स्वच्छ करून ऐतिहासिक वास्तूला मोकळा श्वास देण्यात आला. या मोहिमेत गणेशराव गुजर, प्रणित नलवडे, कुशल निंबाळकर, सुमित सुतार, अभिजीत जाधव, राहुल जाधव, फौजी निलेश वाघमळे, स्वप्निल शिंदे, अक्षय शिंदे या सर्व दुर्गसेवकांचे विशेष सहकार्य लाभले.

Advertisements

Related Stories

सातारा पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक सुनील काळेकर यांची बिनविरोध निवड

Omkar B

नगरसेवक काटवटे यांनी ठेकेदाराला खडसाविले

Patil_p

सलग तिसऱया दिवशी हजारावर रूग्णांची नोंद

Patil_p

सज्जनगडावरील भक्त निवास 1 डिसेंबरपासून सुरू

datta jadhav

मे महिन्यात कोरोनाने जिह्याचे कंबरडे मोडले

Patil_p

कराडात बुधवारपासून दुकाने उघडणार

Patil_p
error: Content is protected !!