तरुण भारत

उचगाव व्यापाऱ्यांच्या लुट प्रकरणी तपास पथके रवाना

उचगांव / वार्ताहर

पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगाव( ता.करवीर ) रेल्वे पुलावर ज्ञानराज व आंबूराज नाडर या व्यापारी बंधूंवर हल्ला करून दीड लाखाची कॅशबॅग लंपास केल्याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नसून विविध ठिकाणी पोलिसांची तपास पथके पाठवली आहेत, अशी माहिती करवीरचे उपविभागीय अधिकारी डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली.

तावडे हॉटेल परिसरातील गोळ्या बिस्किट व फरसानचे दुकान बंद करून मोटरसायकलवरून नाडर बंधू घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी त्यांना बुक्क्यांनी मारहाण करत कॉलर पकडून दीड लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग हिसकावून लंपास केली होती. चोरट्यांच्या मारहाणीत ज्ञानराज नारायण नाडर व त्यांचे बंधू आंबुराज नारायण नाडर ( दोघेही रा. निगडे बिल्डिंग, उचगाव, ता करवीर, मूळ रा. मलीएनकुडी, ता नागणेरी, जि. त्रियनवेली, तमिळनाडू) दोघे जखमी झाले होते. शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगाव रेल्वे पुलावर ही घटना घडली होती.

गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकामार्फत तपास सुरू आहे. विविध ठिकाणी ही पथके चोरट्यांचा शोध घेत आहेत. या लुटीबद्दल अज्ञात 5 चोरट्यांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा शनिवारी पहाटे गुन्हा दाखल झाला होता.

Related Stories

संचारबंदी काळात परप्रांतीयांना आमदार पी.एन. पाटील यांचा मदतीचा हात

Abhijeet Shinde

वडनेरे समितीच्या अहवालातील सुचनांच्या अनुषंगाने पूरनियंत्रणासाठी बृहत आराखडा करा : जलसंपदा मंत्री पाटील

Abhijeet Shinde

सांगली : मार्केट यार्डात चाकूचा धाक दाखवून दहा लाख लुटले

Abhijeet Shinde

गांधीनगरमधून तामिळनाडूच्या व्यापाऱ्याचे पाच लाख लंपास

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde

माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी उद्या कोल्हापुरात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!