तरुण भारत

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 15,048 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज

ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 15, 048 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 11 लाख 49 हजार 603 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 79.64 % आहे.

 
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 13,702 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 14 लाख 43 हजार 409 वर पोहचली आहे. सध्या 2 लाख 55 हजार 281 रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी दिवसभरात 326 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 38 हजार 084 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.64 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 71 लाख 11 हजार 204 नमुन्यांपैकी 20.29 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 22 लाख 09 हजार 696 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 27 हजार 939 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

ऑगस्टपर्यंत संसर्गाचे प्रमाण शून्यावर : डॉ. रोहिदास बोरसे

prashant_c

सेनापती कापशीतील खासगी तरुण डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू

triratna

सांगली : आंबेगावात कोरोना बाधित रुग्ण, संपूर्ण गाव बंद

triratna

पाटण तालुक्यासाठी 107 कोटींची तरतूद

Patil_p

मायणीचे सुपूत्र डॉ. नानासो थोरात यांचा साता समुद्रापार झेंडा

Patil_p

पोवई नाका प्रांत कार्यालय परिसर नो पार्किंग झोन

Shankar_P
error: Content is protected !!