तरुण भारत

सलग चौथ्या दिवशीही शास्त्रीनगर येथे शोधमोहीम

प्रतिनिधी/ बेळगाव

शास्त्रीनगर नववा क्रॉस येथे गुरुवारी रात्री एक मोठा अजगर नागरिकांच्या दृष्टीस पडला. मानवी वस्तीत अजगर शिरल्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. या अजगराला पकडण्यासाठी सलग चार दिवस शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. रविवारी रात्रीपर्यंत अजगराचा शोध सुरू ठेवण्यात आला होता. जेसीबी तसेच सकींग मशीनच्या साहाय्याने पाणी बाजूला सारून शोध घेण्यात येत होता.

Advertisements

दैवज्ञ शाळेच्या मागील बाजूस असणाऱया मानवी वस्तीत गुरुवारी रात्री अजगर दृष्टीस पडला. हा अजगर अंदाजे 12 ते 15 फूट लांबीचा असण्याची शक्मयता  आहे. इतका मोठा अजगर मानवी वस्तीत आला कसा, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत होते. शहरात मागील आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा अजगर आल्याची शक्मयता आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी सलग चार दिवस शास्त्रीनगर परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

रहिवाशांनी मानले आयुक्तांचे आभार

रविवारी करण्यात आलेल्या शोध मोहिमेसाठी महानगरपालिकेने सकींग मशीन व जेसीबी उपलब्ध करून दिले होते. रहिवाशांनी केलेल्या मागणीप्रमाणे मनपाने साहित्य उपलब्ध करून दिल्याने रहिवाशांनी आयुक्त के. एच. जगदीश यांचे आभार मानले. या शोध मोहिमेमध्ये गणेश दड्डीकर, सुधीर किल्लेकर, सुनील गोडसे, सागर उजगावकर, विशाल मुरकुटे, विनायक हावळण्णाचे संतोष साळवी, सुधीर साळवी, गुरू अणवेकर, विनायक बिर्जे, महांतेश कोमार, शिवराई कोमार यासह इतर रहिवाशांनी हातभार लावला.

नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज

चार दिवसांपासून अजगर पकडण्याची मोहीम सुरू आहे. परंतु त्याला पकडण्यात अद्याप यश आले नाही. शेजारी मानवी वस्ती असल्यामुळे दक्षता घेण्याची गरज आहे. विशेषत: शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, तसेच त्यांना बाहेर सोडू नये, असे आवाहन सर्पमित्र गणेश दड्डीकर यांनी केले आहे.  

Related Stories

जमखंडी बेटी बचाओ

Patil_p

सावळगी तालुका केंद्र करण्याची मागणी

Patil_p

व्हॅक्सिनचा हवाई प्रवास

Amit Kulkarni

केएलईमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण

Amit Kulkarni

एक हात नसताना लढणाऱया राजेश्वरी हिरेमठ

Patil_p

बेळगाव वन कार्यालयांतील कामे ठप्प

Amit Kulkarni
error: Content is protected !!