तरुण भारत

नागनुरी यांनी नियुक्त केलेले पदाधिकारीच अधिकृत

जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांची स्पष्टोक्ती, मजुकर यांच्या आरोपांचे केले खंडन

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

शिवसेनेचे नि÷ावंत कार्यकर्ते सीमाप्रश्नासाठी झोकून देऊन काम करीत आहेत. परंतु काहीजण मात्र नेते म्हणवून पद गेले असतानाही जिल्हाध्यक्ष म्हणून मिरवत आहेत. आमच्याकडे शिवसेनेचे अधिकृत नियुक्तीपत्र व ओळखपत्र आहे. त्यामुळे सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांनी नियुक्ती केलेले पदाधिकारीच अधिकृत असल्याची स्पष्टोक्ती बेळगाव जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी रामलिंगखिंड गल्ली येथील मध्यवर्ती कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. पदावर नसताना कोणत्याही पदाधिकाऱयाने मर्जीप्रमाणे नावासमोर पद लावू नये. बेळगाव जिल्हय़ाला सध्या एकच जिल्हाध्यक्ष असून, अन्य कोणीही जिल्हाध्यक्ष म्हणून मिरवू नये. आमचे कोणाशीही मतभेद नाहीत. परंतु शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचे भासवून सुरू असलेला गोंधळ वेळीच थांबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

हणमंत मजुकर जिल्हाध्यक्ष पदावर असताना त्यांनी उपजिल्हाप्रमुख महेश टंकसाळी यांच्यावर कारवाई करत त्यांना पदापासून बाजूला केले होते. तसे पत्र  मध्यवर्ती शिवसेना कार्यालयात आहे. परंतु महेश टंकसाळी अद्यापही उपजिल्हा प्रमुख म्हणून सर्वत्र हिंडत आहेत. यामुळे शिवसेनेच्या ध्येय-धोरणांना बाधा पोहोचत असून असे प्रकार थांबवून एका झेंडय़ाखाली या, असे आवाहन उपजिल्हा प्रमुख बंडु केरवाडकर यांनी केले आहे. सध्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश शिरोळकर, उपजिल्हाध्यक्षपदी बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहरप्रमुख प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, पिराजी शिंदे, प्रकाश राऊत हे पदाधिकारी कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  

Related Stories

बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गाला मिळणार गती

Patil_p

नवख्या उमेदवारांना संधी देऊन विकासाची केली अपेक्षा

Patil_p

शिक्षणतज्ञ जे.पी.नाईक यांच्या चरित्राचे उद्या प्रकाशन

Patil_p

हिडकल येथील रेकॉर्डरुम बेळगावला हलवावे

Omkar B

रंगोली संगीत परिवारच्या फेसबुक पेजवर अकॅडमी ऑफ म्युझिकच्या शिष्य-गुरुंचा कार्यक्रम

tarunbharat

खानापूर तालुक्यात वाळूतस्करी करणाऱयांवर कारवाई करा

Patil_p
error: Content is protected !!