तरुण भारत

रोल… कॅमेरा…ऍक्शनसाठी चंद्रमुखी सज्ज

महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाला त्या दरम्यान प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर आणि गोल्डन रेशो फिल्म्सचे पियूष सिंह यांनी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला एबी आणि सीडी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला आणि आता जागतिक महामारीच्या परिस्थितीत योग्य ती काळजी घेऊन त्यांनी चंद्रमुखी या त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करण्याचे ठरविले. अक्षय बर्दापूरकर हे सलग तिसऱयांदा पियूष सिंह यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती करत आहेत. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्यात ऑन फ्लोअर जाणार आहे. या जागतिक महामारीच्या प्रसंगातून सावरत पुढे येणारे हे पहिले मराठी बॅनर असेल.

चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार या बद्दल बोलताना दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, दिग्दर्शक म्हणून माझा पुढील चित्रपट चंद्रमुखी येत्या नोव्हेंबरला ऑन फ्लोर जातोय, अर्थात सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनच शूटिंग केले जाईल. बऱयाच दिवसांनी चित्रपटाच्या सेटवर जातोय, नवीन कामाची सुरुवात होतेय, याचा आनंद आहेच, पण त्याचसोबत जबाबदारी देखील आहे. जानेवारीमध्ये चंद्रमुखीचं पोस्टर तुम्ही पाहिलंत, त्याला खूप प्रेम दिलंत. आता तुम्हांला जाणून घ्यायचं असेल की चंद्रमुखीच्या भूमिकेत नक्की कोणती अभिनेत्री आहे आणि इतर कलाकार सुद्धा कोण आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची आणि माझी नवीन कलाकृती लवकरात लवकर तुमच्या समोर आणण्याची माझी देखील इच्छा आहे. असे तो म्हणाला.

अक्षय बर्दापूरकर यांच्यासाठी हा केवळ एक चित्रपट नसून हा लार्जर दॅन लाईफ प्रोजेक्ट आहे आणि यावर टिप्पणी करताना त्यांनी म्हटले की, विषयाच्या कथेसह प्रेक्षकांना एक सुंदर अनुभव देणारा चित्रपट म्हणून चंद्रमुखी हे उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटाची कथा एका स्त्राr भोवती फिरते जी समाजात चालणाल्ल्या अपारंपारिक मार्गावर  स्वतरूच्या वास्तवतेचा शोध घेते. चित्रपटाची कथा सांगण्यास आम्ही उत्साही आहोत, पण त्याच वेळी विश्वास पाटील यांची बेस्टसेलरची सत्यता टिकवून ठेवण्याची देखील मोठी जबाबदारी आहे. मराठी चित्रपटसफष्टीला आणखी उंचीवर नेण्याचे आश्वासन या चित्रपटाने दिले आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स् निर्मित या चित्रपटात प्रसाद ओक यांचे दिग्दर्शन, चिन्मय मांडलेकर यांची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी, निलेश वाघ यांचं कला दिग्दर्शन पाहायला, अनुभवयाला मिळणार आहे आणि बऱयाच वर्षांनी अजय- अतुल यांचं अस्सल मातीतलं संगीत ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे.

Related Stories

आमिर खानच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

pradnya p

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालची चौकशी सुरु

pradnya p

कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती : अशोक सराफ

Patil_p

ऑस्करच्या शर्यतीत ‘जल्लिकट्टू’ बाहेर

Patil_p

व्यक्तिरेखेची लांबी नव्हे, काम महत्त्वाचे

Patil_p

झी टॉकीज देणार उदयोन्मुख लेखकांना संधी

Patil_p
error: Content is protected !!