तरुण भारत

जादा जागा बळकविण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरु

चिंबल ग्रामस्थांचे सार्वजनीक बांधकाम खात्याला इशारा

प्रतिनिधी/ पणजी

चिंबल येथील महामार्गाच्या बाजुल्या असलेली एwतिहासिक इम्यॅक्युलेट कॉन्सेप्शन ऑफ मॅरी कपॅल(चर्च)ची मोकळय़ा जागेत सर्वीस रोड करण्यासाठी पुर्वी मापून दिलेल्या जागेतेच रस्ता करावा यापुढे एक इंचही जादा जागा बळकवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला रस्त्यावर उतरु असा कडक इशारा चर्चच्या समिती व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला (पीडब्लूडी) दिला आहे.

  दरम्यान चर्च समिती व ग्रामस्थांनी सार्वजनीक बांदाकाम खात्याचे आभियांत्रिक एडवर्ड परेरा यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली. व त्यांना पूर्व नियोजित प्रकल्प देखील दाखविण्यात आला.

सरकार नेहमीच आपल्या पूर्व नियोजनात बदल करत असते आणि येथीही तेच झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आता हळूहळू आता आपले नियोजन बदलून चर्चच्या हद्दीत येणाच्या प्रयत्न करत आहे. सदर चर्च ही पुरातन काळातील एwतिहासिक चर्च आहे, त्यामुळे या चर्चवर आघात म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळणे आहे. असा सुर या चर्चेत उमटला.

काही वर्षापूर्वी तत्पुर्ती या चर्च परीसरातील बांधकाम मोठय़ा प्रमाणात मोडले जाणार होते, त्यावेळी त्याला बराच वाद होऊन प्रकरण चिघळणावर पोहचले होते. परंतु मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असाताना चर्च समितींना सदर चर्च सुरक्षीत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी चर्च समिती व पर्रीकर यांच्यात झालेल्या बैठकीत तीन ते चार मिटर जागा प्रकल्पासाठी सोडण्याचे ठरविले होते. व ठरल्याप्रमाणे सदर जागा मापून त्या ठिकाणी पिवळय़ा रंगाची पट्टी मारली होती. पण आता सार्वजनिक बांधकाम खाते वेगळय़ाच नियोजनाने आले आहेत. हे लक्षात येतात चर्च समितीने त्वरीत येथे हरकत घेतली असून यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आभियंतांना धारेवर धरले.

यावेळी घटनास्थळी रुदाल्फ फर्नांडिस, माजी आमदार व्हिक्टर गोन्सालवीस, चिंबलचे सरपच संदिप चोपडेकर, चर्च समितीचे अध्यक्ष आलेक्स मेंडोसा, समनवेयक मार्सिलीना फर्नांडिस, सदस्य जसींता फर्नांडिस, रोझी लोबो, कॉन्सिल बारकाय, सिंधीया फर्नांडिस, टोनी लोबो व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

खनिज वाहतुकीत दरवाढ मिळेपर्यंत ट्रक रस्त्यावर धावणार नाहीत !

Patil_p

कचऱयासाठी मनपाला अत्याधुनिक वाहने प्राप्त

Patil_p

मडगावात लाखो रुपयांच्या इलेक्ट्रीक यंत्रणेची चोरी

Patil_p

मास्क न वापरणाऱयांना 200 रुपये दंड द्या

Omkar B

पणजी मार्केट आजपासून खुले

Omkar B

’अनादर राऊंड’ ने उघडणार आंचिमचा पडदा

Patil_p
error: Content is protected !!