तरुण भारत

‘उसळी’चे संकेत

सरत्या आठवडय़ात शेअर बाजारात दिसून आलेली चमक गुंतवणूकदारांसाठी आशादायक ठरली. हॉटेल-रेस्टॉरंट्स, चित्रपटगृहे यांचे ‘पुनश्च हरीओम’, मोरेटोरियममधील चक्रवाढ व्याजाबाबत केंद्राने दिलेला दिलासा, सप्टेंबरमध्ये वाढलेले जीएसटीचे संकलन, दुसऱया तिमाहीतील औद्योगिक उत्पादनवाढ आणि परदेशी गुंतवणुकीचा वाढता ओघ या सर्व बाबी लक्षात घेता चालू आठवडय़ात शेअर बाजाराने ‘उसळी’ घेतल्यास नवल वाटायला नको. जागतिक पातळीवरुन नकारात्मक संकेत न आल्यास बाजारात वृद्धी हमखास दिसून येईल.

देशातील कोरोनाच्या आकडय़ांमध्ये ‘तुलनेने’ घट होत चालल्यामुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून असलेले निराशेचे मळभ हळुहळू दूर होताना दिसत आहे. कोरोनाचा धोका टळलेला नाही; परंतु सुरक्षिततेचे नियम पाळून अर्थचक्राचा गाडा आता पूर्ववत होऊ लागला आहे. शेअर बाजारात याचे स्पष्ट पडसाद गत आठवडय़ात दिसून आले. 2 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी बाजाराला सुटी होती, तेव्हा गतसप्ताहात चारच दिवस बाजाराचे कामकाज चालले. गुरुवारी सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 629 अंकांनी वधारुन 38,697 अंकांवर बंद झाला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 169 अंकांनी वाढून 11,416 अंकांवर बंद झाला. वधारलेला रुपया, लॉकडाऊनच्या निर्बंधांतील शिथीलता, जीएसटी संकलनाने गाठलेला सहा महिन्यांतील उच्चांक, वाढलेला पीएमआय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून आलेले सकारात्मक संकेत यामुळे गुरुवारी शेअर बाजारात चैतन्याची लाट दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यात दमदार वाढ दिसून आली. मल्टिप्लेक्स  सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे या कंपन्यांच्या समभागांमध्ये जवळपास सात टक्क्मयांपर्यंत वाढ झाली.  याखेरीज बँकिंग (3.46 टक्के), आयटी आणि टेलिकॉम कंपन्यांच्या समभागांतही मोठी वाढ दिसून आली. इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक म्हणजे 12.29 टक्क्मयांनी वधारले. तथापि, डॉ. रेड्डी लॅब्स, हिंडाल्को, आयटीसी, रिलायन्स, एनटीपीसीच्या समभागात घट दिसून आली. याखेरीज मंगळवारी दाखल झालेल्या तिन्ही आयपीओंना गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.

Advertisements

गत सप्ताहातील तेजीचा धागा चालू आठवडय़ातही पुढे जाताना दिसेल. याचे कारण सप्टेंबरमध्ये पीएमआय निर्देशांक 56.8 अंशावर पोहोचला आहे. जानेवारी 2012 नंतर या निर्देशांकाची ही सर्वोत्तम झेप आहे. ऑगस्टनंतर, सलग दुसऱया महिन्यांत झालेली ही वाढ उत्पादनक्षेत्र सुरळीत होत असल्याचे दिसते. सेवाक्षेत्रातही अशीच स्थिती आहे. दुसरीकडे जीएसटी संकलन सप्टेंबर 2019च्या तुलनेत चार टक्क्मयांनी तर जुलै 2020 च्या तुलनेत 10 टक्क्मयांनी वाढले आहे. वाहनउद्योगातही विक्रीतील वाढीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. मारुती, किया, बजाज ऑटो, टीव्हीएस या कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विक्रीत 10 टक्क्मयांहून अधिक वाढ दिसून आली आहे. सलग सहा महिने घसरणीला लागलेली निर्यात सप्टेंबर महिन्यात 5.27 टक्क्मयांनी वाढली आहे. ‘अनलॉक 5’च्या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, सिनेमागृहे आदी सुरु होणार असल्याने अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर होण्यास मदत होणार आहे. या जोडीला केंद्र सरकारने मोरेटोरियमबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्राने मोठा दिलासा मध्यमवर्गाला मिळाला आहे. लॉकडाऊनच्या सहा महिन्यांच्या काळातील कर्जदारांच्या व्याज रकमेवरील चक्रवाढ व्याज रद्द करण्याची तयारी केंद्राने दर्शवली आहे. दुसरीकडे केंद्र सरकार टुरिझम, हॉस्पिटॅलिटी आणि एव्हिएशन या इंडस्ट्रीसाठी पॅकेज जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींचे शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून येतील. अमेरिकन सरकार लवकरच दोन लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्याची शक्मयता आहे. तसे झाल्यास एफपीआयकडून होणारी खरेदी वाढून निफ्टी 12,400पर्यंत पोहोचू शकतो, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.

 या आठवडय़ात बँकिंग, ऑटो, आयटी याबरोबरीने हॉटेल इंडस्ट्री, सिनेमा इंडस्ट्रीच्या समभागांमध्ये आणखी तेजी दिसून येऊ शकते. विशेषतः आगामी सणासुदीचा-उत्सवाचा काळ विचारात घेता वाहन कंपन्यांमधील समभागांची खरेदी फायदेशीर ठरेल. आयटी कंपन्यांच्या समभागांचा विचार करता मागील सहा महिने गेल्या 11 वर्षांत सर्वात चांगले राहिले आहेत. तथापि, एव्हिएशन इंडस्ट्रीसाठी सर्वोच्च न्यायालयाने लॉकडाऊन काळातील ग्राहकांची बुकिंगची रक्कम परत करण्याबाबत दिलेला निर्णय नकारात्मक ठरू शकतो. रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये जीआयसी आणि टीजीपी या दोन कंपन्यांनी 5512 आणि 1837 कोटींची गुंतवणूक केल्याने या समभागांत पुन्हा तेजी दिसून येऊ शकते. याखेरीज अल्ट्रामरीन अँड पिगमेंटस लिमिटेडचा 260 रुपये मूल्य असणारा शेअर 320च्या टार्गेटने खरेदी करता येईल. एलंटास बेकचा समभाग 2590 रुपयांवरुन येणाऱया काळात 3190 पर्यंत जाऊ शकतो. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये इंडियन हॉटेल्सचा समभाग खरेदी करणे फायदेशीर ठरेल.

शेअर बाजारातील तेजीचा सिलसिला खंडित होण्यास काही घटक कारणीभूत ठरू शकतात आणि त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गतआठवडय़ात डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने जगभरातील शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. चालू आठवडय़ात जागतिक बाजारावर हा परिणाम किती राहतो हे पहाणे आवश्यक आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांच्या पूर्वी बाजारात एक मोठे करेक्शन येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी संयम आणि सावध राहणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँकेकडून लवकरच द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार आहे. वाढत चाललेल्या भाववाढीच्या पार्श्वभूमीवर रेपो दरात कपात होण्याची शक्मयता दिसत नाहीये. याखेरीज कोरोनाची दुसरी लाट आल्याने युरोपमधील काही देशांत टाळेबंदी जाहीर झाल्यास त्याचे पडसाद बाजारात दिसू शकतात. पण एकंदर बाजाराचा मूड पाहता ‘लगे रहो…’ आहे.

– संदीप पाटील

Related Stories

संचारबंदीच्या कालावधीत वीज मागणी 26 टक्क्मयांनी घटली

tarunbharat

डिसेंबरमध्ये वाहन कंपन्यांची विक्री झाली समाधानकारक

Patil_p

हिंदुस्थान कॉपरमधील हिस्सा विकणार

Amit Kulkarni

सौदीच्या अराम्कोचा नफा 73 टक्क्मयांनी घसरला

Patil_p

स्टोरेज मार्केटमध्ये 4 टक्क्यांची वाढ

Patil_p

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे बाजारातील तेजीत घसरण

tarunbharat
error: Content is protected !!