तरुण भारत

रिफायनरीसाठी भव्य मोर्चा काढणार!

वार्ताहर/  राजापूर

इथल्या बेरोजगारीचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल व राजापूर बाजारपेठेला पुन्हा उर्जितावस्था आणायची असेल तर आपल्या दाराशी आलेला रिफायनरी प्रकल्प हातचा जावू न देणे, ही एक संवेदनशील नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रकल्पाबाबतची वस्तूस्थिती जाणून न घेता प्रकल्पाला होणारा विरोध हा राजकीय आहे. तो तालुक्याच्या भवितव्याला हानीकारक आहे, हे सत्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी भव्य मोर्चा काढून ‘एल्गार’ करण्याचा निर्धार रविवारी येथे पार पडलेल्या सर्वपक्षीय नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थनार्थ बैठकीत करण्यात आला.

येथील ज्येष्ठ विधीज्ञ व राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मातोश्री भवनामध्ये ही सर्वपक्षीय बैठक पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेकर, सचिव अविनाश महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर, नगराध्यक्ष ऍड.जमिर खलिफे, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, ज्येष्ठ व्यापारी मजिद पन्हळेकर, शिवसेनेचे राजा काजवे, भाजपाचे वसंत पाटील, व्यापारी संघाचे दिनानाथ कोळवणकर उपस्थित होते. प्रास्ताविक अविनाश महाजन यांनी करून प्रकल्प समर्थनार्थ कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने आजवर घेतलेली भूमिका तसेच प्रकल्पाची गरज व सद्यस्थितीचा परामर्श घेतला. त्यानंतर उपस्थित सर्वच मान्यवरांनी प्रकल्प समर्थनार्थ भूमिका मांडत हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे, त्यासाठी सर्वपक्षीय ताकद उभी करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

प्रारंभी नगराध्यक्ष ऍड.जमिर खलिफे यांनी हा प्रकल्प तालुक्यात होणे अत्यावश्क असल्याचे नमूद करून या प्रकल्प समर्थनार्थ आवश्यक ते सर्व सहकार्य व भूमिका घेण्याची ग्वाही दिली. यावेळी ज्येष्ठ व्यापारी मजिद पन्हळेकर यांनी उद्बोधक मार्गदर्शन केले. केवळ राजकीय अस्थिरतेतून या प्रकल्पाला विरोध होत असून तो मोडीत काढण्याची गरज व्यक्त केली.

भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी प्रकल्प समर्थनार्थ परखड भूमिका मांडली. हा प्रकल्प ज्या भागात होत आहे, त्या सर्व ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. जर हा प्रकल्प तालुक्याचे भवितव्य घडवणार असेल तर इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम देणार असेल तर त्यांनी पक्षाचा राजीनामा देवून प्रकल्प समर्थनार्थ उभे राहिले पाहेजे. त्यासाठी सर्वपक्षीयांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. माजी नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी जे सनदशीर मार्गाने मागून मिळत नाही, ते संघर्षातून मिळवण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका मांडली.  यावेळी विद्याधर राणे, चंद्रकांत लिंगायत, दिनानाथ कोळवणकर, सुरेश तावडे यांनी आपले विचार मांडत प्रकल्प समर्थनार्थ आता सर्वपक्षीय उठाव करण्याचा निर्धार केला. अध्यक्षीय भाषणात ऍड.शशिकांत सुतार यांनी प्रकल्प समर्थनार्थ प्रसंगी मोर्चा आंदोलनाचा मार्ग अवलंबून प्रकल्प समर्थनाची ताकद आपण शासनाला दाखवून देवू, असा निर्धार व्यक्त केला. सूत्रसंचालन सीए नीलेश पाटणकर यांनी केले.

बैठकीला ऍड. यशवंत कावतकर, मन्सूर काझी, नजीर टोले, जयंत कदम, जावीद काळसेकर, सुहास फोडकर, शैलेंद्र संसारे, सूर्यकांत पुजारी, प्रवीण खांबल, कलिम चौगुले, उल्हास आंबोळकर, सतीश महाजन, दिलीप तावडे, उपनगराध्यक्ष संजय ओगले, विवेक गादीकर, सिराज साखरकर, विजय हिवाळकर, सुहास मराठे, प्रकाश पारकर, वैभव वेलणकर, संजय सरफरे, विजय पाध्ये, संजय वाघधरे, राजेश कांबळी, मंगेश मांजरेकर, काशिनाथ पाटील, नीलेश वाईम, माजी नगरसेवक रवींद्र बावधनकर, ऍड. सुशांत पवार, सुनील रिंगणेकर, शांताराम तळवडेकर आदींसह अन्य सर्वपक्षीय ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

चिपळूण शहरात दोन दिवसात 1366 कुंटुबांचे सर्वेक्षण

Patil_p

रत्नागिरी : कोरोना रूग्णालयाची क्षमता 115 ने वाढविणार

triratna

जिल्हा मंडप, लाईट, केटरर्स असोसिएशनने केला सरकारचा निषेध

Patil_p

मार्गताम्हानेतील टेक्सटाईल्स पार्कबाबत आठवडाभरात बैठक

Patil_p

मास्क न लावता फिरणे पडले महागात

Patil_p

अर्सेनिक अल्बम 30 साठी व्याज परत घेणे असंयुक्तिक

NIKHIL_N
error: Content is protected !!