तरुण भारत

सौदी अरेबिया : सात महिन्यानंतर मक्का भाविकांसाठी खुली

ऑनलाईन टीम / रियाध : 

सौदी अरेबियात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सात महिन्यांपासून बंद असलेली मक्का रविवारपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.

मक्का येथील यात्रा मुस्लीम समाजासाठी पवित्र यात्रा मानली जाते. मक्का खुली करण्यात आली असली तरी कोरोनाच्या वाढता प्रभाव लक्षात घेता भाविकांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. तीन टप्प्यात मक्का दर्शन खुले करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सहा हजार भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुसरा टप्पा 18 ऑक्टोबरला सुरू होईल.

उमरासाठी दरवर्षी जगभरातून लाखो मुस्लीम मक्का येथे येतात. मात्र, सध्या दररोज सरासरी 15 हजार झायरी आणि 40 हजार नमाजी मक्का येथे जाऊ शकतील. 1 नोव्हेंबरपासून मक्कासाठी परदेशातील व्यक्तींनाही परवानगी दिली जाऊ शकते. 

Related Stories

इंडिगो विमानाचे कराचीत आपत्कालीन लँडिंग; तरीही वाचला नाही प्रवाशाचा जीव

datta jadhav

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 1.41 लाखांवर

datta jadhav

लसीचे दुष्परिणाम झाल्यास ब्रिटन सरकार देणार नुकसान भरपाई

datta jadhav

कोरोनाच्या पहिल्या लाटेवर विजयाच्या दिशेने

Omkar B

ऑस्ट्रेलियात परदेशी पत्रकारांवर निर्बंध

datta jadhav

पोर्टलँड हिंसेवरून अमेरिकेत राजकीय वाप्युद्ध

Patil_p
error: Content is protected !!