तरुण भारत

सांगलीत नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

प्रतिनिधी / सांगली

सांगलीत राष्ट्रसंत गाडगेबाबा लाँड्री संघटनेच्या प्रथम वर्धापनदिना निमित्त संघटनेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वर्षभरापूर्वी राष्ट्रसंत गाडगेबाबा लाँड्री संघटनेची स्थापना करण्यात आली होती. वर्धापन दिनाचे औचित्य साधून संघटनेतर्फे नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इन्फीगो आय केअर हॉस्पिटलतर्फे ही तपासणी करण्यात आली. परीट समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय बन्ने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी १०० पेक्षा अधिक जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. नेत्रतपासणीला महिलांचाही प्रतिसाद लाभला. यावेळी लाँड्री संघटनेचे अध्यक्ष गोपाल पवार, महिला आघाडीच्या अध्यक्षा लता साळुंखे, सागर देवरुखकर, धनंजय गाडगीळ, धनाजी कदम, संजय पवार, बन्सी कदम, चंद्रकांत पवार, गणेश डोंगरे, भरत पाळेकर, माजी सैनिक माधव साळुंखे, ओंकार साळुंखे, जयसिंग लोखंडे आदी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

जळगाव वसतिगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही : गृहमंत्री

Rohan_P

माळशिरसचे मुख्याधिकारी ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागा’च्या जाळ्यात

Sumit Tambekar

सांगली : महापालिकेच्या शाळा क्र.२० मधील विद्यार्थी गिरवतात स्मार्ट धडे

Abhijeet Shinde

सहकार खातं अमित शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही – संजय राऊत

Abhijeet Shinde

सातारा पालिका आता तरी विलिनीकरण कक्ष उभारणार का?

Patil_p

सांगली : शिट्टी वाजली… गाडी सुटली…!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!