तरुण भारत

नवाज शरीफ यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

लंडनमध्ये लष्करविरोधी भाषण करणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर लाहोरमध्ये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानी मीडियाने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. 

Advertisements

काही दिवसांपूर्वीच नवाज शरीफ यांनी लंडनमध्ये पाकिस्तानी लष्कराविरोधात भाषण केले होते. त्यावरून नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या प्रतिष्ठित संस्थांविरोधात कट रचत आहेत. तसेच पाकिस्तानला गुंडागर्दी करणारे राष्ट्र घोषित करणे, असा त्यांच्या भाषणांचा उद्देश होता, असा आरोप ठेवत शरीफ यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शरीफ यांच्या लष्करविरोधी भाषणाला भारतीय मीडियानेही जोरदार प्रसिद्धी दिली होती. त्यावरून शरीफ हे भारताचे एजंट आहेत. ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाबाहेर गुपचूप भेटतात. शरीफ यांनी देशात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप पाकचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी केला होता. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही शरीफ यांना लक्ष्य केले होते. पाकिस्तानी सैन्यावर राजनैतिक हस्तक्षेपाचा आरोप करुन शरीफ एक धोकादायक खेळ खेळत आहेत, अशी टीका इम्रान यांनी केली होती.

Related Stories

जपानच्या पंतप्रधानपदी फुमिओ किशिदा

Patil_p

‘काही न करता’ लाखोंची कमाई

Patil_p

पेरूमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 9 लाखांचा टप्पा

datta jadhav

तालिबानने पाकिस्तानला धमकावले सीमेवरून वाढला तणाव

Patil_p

मुलांच्या खेळण्यांसारख्या इमारती

Patil_p

कमला हॅरिस यांना जीवे मारण्याची धमकी

datta jadhav
error: Content is protected !!