तरुण भारत

जत येथे शासकीय धान्य गोदामावर चोरट्याचा डल्ला

प्रतिनिधी / जत

जत शहरापासून मंगळवेढा रस्त्यावर दोन किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या शासकीय धान्य गोदामावर चोरट्यांनी डल्ला मारत 1850 रुपये किमतीचे धान्य लंपास केले. हा प्रकार रविवारी रात्री घडला, या बाबतची अधिक माहिती अशी की,जत तालुक्यातील स्वस्थ धान्य दुकानासाठी पुरवठा करणारे धान्य शासकीय गोदामात ठेवले जाते व त्या ठिकाणाहून तालुक्यात धान्याचा पुरवठा केला जातो. त्या ठिकाणी असणारे सुरक्षा रक्षक हे काही महिन्यांपूर्वी सेवा निवृत्त झाल्याने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ही जागा रिक्त आहे.

रविवारी सायंकाळी कर्मचारी इस्माईल शेख हे शासकीय गोदामावर बंद करून गेले.त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांनी त्यांचा फायदा घेत गोदामाच्या पाठीमागील बाजूचे शेटर उचकटून गोदामामध्ये प्रवेश करत 50 किलो वजनांची तांदळाची 9 पोती, 1350 रुपये किंमतीची व 50 किलो वजनांची, 5 मक्याची पोती 500 रुपये किंमतीची असा एकूण 1850 रुपयचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला.

या घटनेची माहिती मिळताच जतचे तहसीलदार सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. त्यानंतर सशयित आरोपींवर 380 प्रमाणे जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

Related Stories

वंदूर येथील पूरग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा

Abhijeet Shinde

सांगली : विमा कंपन्यांकडून शेतकरी वाऱ्यावर!

Abhijeet Shinde

सांगली : शांतिनिकेतनमध्ये 1971 युध्दातील रणगाडा दाखल

Abhijeet Shinde

मुसळधार पाऊसाने दिघंची परिसरात हाहाकार,शेतकरी उध्वस्त

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य ‘सलाईनवर’!

Abhijeet Shinde

सांगली : जन्म-मृत्यू दाखल्याबाबत तक्रार येता कामा नये – महापौर सूर्यवंशी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!