तरुण भारत

धनंजय जाधव यांची भाजप पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड

ऑनलाईन टीम / पुणे :

माजी नगरसेवक  धनंजय जाधव यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नियुक्तीचे पत्र धनंजय जाधव यांना दिले. पुणे शहरात पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी धनंजय जाधव यांच्या राजकीय वाटचालीच्या अनुभवाचा उपयोग होईल, असे जगदीश मुळीक यांनी पत्राद्वारे सांगितले. 


धनंजय जाधव यांनी विविध संघटनांवर काम केले आहे. पॉवरलिफ्टिंग असोसिएशन पुणे जिल्ह्याचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहतात. द हिंदू फाउंडेशनचे ते अध्यक्ष असून संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य केले जाते. तसेच पुणे जिल्यातील नामांकित पुणे श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे मागील दहा वर्षे संस्थेच्या माध्यमातून आयोजन करण्यात येते. प्रथमच पेसापालो वर्ल्ड कपचे देशात आणि पुण्यात चार दिवस आयोजन धनंजय जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आले होते.

याशिवाय जाधव यांनी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. पुण्यात प्रथमच राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  

Related Stories

बुद्धीबळ स्पर्धा : कशीश जैन, सौरभ म्हामणे संयुक्त आघाडीवर

pradnya p

परिचारिकांच्या सन्मानार्थ 81 वर्षाच्या माजी परिचारिकेने दिली 25 हजार रुपयांची देणगी

pradnya p

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Shankar_P

राज्यात नव्या स्ट्रेनचे ८ रुग्ण

triratna

पश्चिम महाराष्ट्रात महावितरणचा वीजचोरांना दणका

pradnya p

पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15,563 वर

pradnya p
error: Content is protected !!